ज्येष्ठांना आधार... "प्रधानमंत्री वय वंदन योजना' 

अतुल सुळे 
Monday, 25 May 2020

पूर्वीच्या योजनेतून मिळणारा परतावा 10 वर्षांसाठी 8 टक्के (वार्षिक) असा ठरलेला होता. परंतु आता नव्या योजनेनुसार तो 'सिनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीम'च्या परताव्या एवढा म्हणजे 7.4 टक्के करण्यात आला आहे.

"प्रधानमंत्री वय वंदन' या ज्येष्ठ नागरिकांसाठी 8 टक्के दराने खात्रीशीर परतावा देणाऱ्या योजनेला केंद्र सरकारने 31 मार्च 2023 पर्यंत मुदत वाढ दिली आहे. पूर्वीच्या योजनेतून मिळणारा परतावा 10 वर्षांसाठी 8 टक्के (वार्षिक) असा ठरलेला होता. परंतु आता नव्या योजनेनुसार तो 'सिनिअर सिटीझन सेव्हिंग स्कीम'च्या परताव्या एवढा म्हणजे 7.4 टक्के करण्यात आला आहे. दरवर्षी 1 एप्रिल रोजी सरकार योजनेचा आढावा घेणार आहे. या परताव्याचा दर 7.75 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक होत असल्यास सरकार संपूर्ण योजनेचा नव्याने विचार करणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वर्षाला 12 हजार रुपये पेंशन हवी असल्यास 1 लाख 56 हजार 658 इतकी गुंतवणूक करावी लागणार आहे. दर महिना 1 हजार रुपये पेंशन हवी असल्यास 1 लाख 62 हजार 162 गुंतवावे लागणार आहेत. ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत (एलआयसी) राबविण्यात येते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

प्रधानमंत्री वय वंदन योजनेला उपलब्ध पर्यायांची ठळक वैशिष्ट्ये बघुया 

1) सिनिअर सिटीझन्स सेव्हिंग स्कीम या योजनेचा व्याजदर सध्या 7.4 टक्के असला तरी तो दर तीन माहिन्यांनी 'रिसेट' करण्यात येतो. या योजनेची मुदत 5 वर्षे असून मुदतपूर्तीच्या एक महिना आधी मुदत तीन वर्षांनी वाढविता येते. वय वंदन योजनेत दरमहा, तिमाही, सहामाही अथवा वर्षातून एकदा पेंशन घेता येते. पण, "सिनिअर सिटीझन योजने'त तिमाही व्याज देण्यात येते. 

"सिनिअर सिटीझन' योजनेतील गुंतवणुकीवर "सेक्‍शन 80 सी' खाली दीड लाख (1,50,000) रुपयांपर्यंत वजावट मिळते. तशी वय वंदन योजनेत मिळत नाही. 

2. बॅंक मुदत ठेवी: सर्वसामान्यतः ज्येष्ठ नागरिकांना बॅंकेत ठेवलेल्या ठेवींवर अर्धा टक्का अधिक व्याज देण्यात येते. मात्र अलीकडेच स्टेट बॅंक, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बॅंकेने 30 सप्टेंबर 2020 पर्यंत, ज्येष्ठ नागरिकांना 0.8 टक्के अधिक व्याज देऊ केले आहे. त्यामुळे त्यांना सुमारे 6.50 टक्के परतावा मिळू शकतो. (5 ते 10 वर्षांसाठी) 

3. खासगी, स्मॉल फायनान्स बॅंकांमधील ठेवी  खासगी, स्मॉल फायनान्स बॅंकां ज्येष्ठ नागरिकांना 7.25 ते 7.85 टक्के वार्षिक दराने 5 वर्षांसाठी व्याज देत आहेत. या बॅंकांमधील 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विम्याचे कवच असते. 

4. आरबीआय बॉण्ड:  आरबीआय बॉण्डची मुदत सात वर्षे असून 7.75 टक्के वार्षिक दराने व्याज सहामाही किंवा एकदम मुदतपूर्तीनंतर घेता येते. यात ज्येष्ठ नागरिक नसलेल्या व्यक्तिसुद्धा गुंतवणूक करू शकतात. परंतु ज्येष्ठ नागरिकांना वयाच्या टप्प्यानुसार दंड भरून पैसे मुदती आधी परत मिळू शकतात. यात भारतीय नागरिक (निवासी) कितीही गुंतवणूक करू शकतात. या योजनेतील गुंतवणुकीवर '80 सी'ची वजावट मिळत नाही. 

वरील सर्व योजनांतून मिळणारा परतावा करपात्र असतो. तसेच योजनांच्या तुलनेत 'वय वंदन' योजनेची मुदत सर्वाधिक असली तरी काही ठराविक कारणांसाठी मुदतीआधी पैसे परत मिळू शकतात. अथवा तीन वर्षानंतर कर्जही मिळू शकते. पूर्वीच्या योजनेत 8 टक्के परतावा 10 वर्षांसाठी निश्‍चित होता. आता मात्र परतावा आणि पेंशनची रक्कम दर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला बदलण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

लेखक निवृत्त बॅंक अधिकारी आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atul sule article about senior citizen Pradhan Mantri Vaya Vandana Yojana