'एसआयपी'च्या यशाचे रहस्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mutual-fund-investment

म्युच्युअल फंडातून सुरक्षितरीत्या संपत्तीची निर्मिती करण्याचा एक सुलभ मार्ग म्हणजे, एखाद्या चांगली कामगिरी असणाऱ्या योजनेत काही दशकांसाठी ‘एसआयपी’ करणे! 

'एसआयपी'च्या यशाचे रहस्य

म्युच्युअल फंडातून सुरक्षितरीत्या संपत्तीची निर्मिती करण्याचा एक सुलभ मार्ग म्हणजे, एखाद्या चांगली कामगिरी असणाऱ्या योजनेत काही दशकांसाठी ‘एसआयपी’ करणे! 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘एसआयपी’च्या यशामागे जे रहस्य दडले आहे, त्याला ‘रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग’ असे म्हणतात. जेव्हा आपण एखाद्या योजनेत ‘एसआयपी’ करतो तेव्हा दर महिन्याला एक ठरावीक रक्कम गुंतवीत असतो. खरेदीची किंमत (नेट ॲसेट व्हॅल्यू) मात्र दर महिन्याला बदलत असते. जेव्हा ‘एनएव्ही’ जास्त असते, तेव्हा कमी युनिट्‌स खरेदी केली जातात; तर जेव्हा ‘एनएव्ही’ कमी असते, तेव्हा तेवढ्याच पैशात जास्त युनिट्‌स खरेदी होतात व त्यामुळे आपली युनिट्‌स खरेदीची सरासरी किंमत कमी होते. शिवाय, आपण छोटी खरेदी करीत असल्याने ‘मार्केट टायमिंग’ करण्याचा प्रश्‍नच उरत नाही! शेअरबाजार कधी ‘व्होलॅटाइल,’ कधी तेजीत तर कधी मंदीत असतो. त्याकडे दुर्लक्ष करून आपण जर सातत्याने ‘एसआयपी’ काही दशकांसाठी चालू ठेवल्यास संपत्तीच्या निर्मितीची प्रक्रिया ‘ऑटोपायलट’वर टाकल्यासारखे होते. 

आता, ‘रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग’ची ‘जादू’ वेगवेगळ्या मार्केट कंडिशन्समध्ये कशी काम करते, ते काही सोप्या उदाहरणांनी समजून घेऊयात.  गुंतवणूकदाराने ४०,००० रुपये एकरकमी गुंतविल्यावर त्याला १,२५० युनिट्‌स मिळाले असे गृहित धरु.

तात्पर्य असे, की लवकरात लवकर उत्तम योजनेत ‘एसआयपी’ सुरू करा व मार्केटच्या चढ-उताराकडे दुर्लक्ष करून काही दशकांसाठी गुंतवणूक चालू ठेवा, शक्‍य असेल तर दरवर्षी उत्पन्न वाढेल तशी ‘एसआयपी’ची रक्कम वाढवीत त्या आणि एनएव्ही खूपच खाली असेल तेव्हा त्याच योजनेत एकरकमी गुंतवणूक करा, म्हणजे संपत्तीच्या निर्मितीची प्रक्रिया ‘ऑटोपायलट’वर ठेवल्यासारखे होईल! अधूनमधून आपण निवडलेल्या योजनेच्या कामगिरीवर मात्र जरूर लक्ष ठेवा.

(लेखक निवृत्त बँक अधिकारी आहेत.)

टॅग्स :Share MarketMutual Fund