esakal | ‘आरटीजीएस’ होणार  २४ X ७ X ३६५ उपलब्ध
sakal

बोलून बातमी शोधा

‘आरटीजीएस’ होणार  २४ X ७ X ३६५ उपलब्ध

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जुलै २०१९ पासून वरील दोन्ही सेवा निःशुल्क केल्या आहेत.सध्या ‘आरटीजीएस’ प्रणालीमध्ये २३७ बँका सहभागी असून,दररोज सहा लाख रुपयांवर व्यवहार होतात.

‘आरटीजीएस’ होणार  २४ X ७ X ३६५ उपलब्ध

sakal_logo
By
अतुल सुळे

रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) ही एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे पाठविण्याची सुविधा आजपासून, म्हणजे ता. १४ डिसेंबर २०२० पासून पूर्ण वेळ म्हणजेच २४ x ७ x ३६५ होणार आहे, असे रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केले आहे. 

या प्रणालीअंतर्गत कमीतकमी दोन लाख रुपये व जास्तीत जास्त कितीही रक्कम आपण एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पाठवू शकता. मोठे उद्योग व संस्था यांना या सुविधेचा फायदा आता दिवसभरात कधीही घेता येणार आहे. त्याचा विशेष फायदा आंतरराष्ट्रीय व्यवहारांना होणार आहे. जगातील फारच थोड्या देशात अशी सोय उपलब्ध आहे.

अर्थविषयक इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

वर्षभरापूर्वी, म्हणजे डिसेंबर २०१९ मध्ये रिझर्व्ह बँकेने, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर (एनईएफटी) ही दोन लाख रुपयांच्या आतील व्यवहारांसाठी वापरण्यात येणारी कार्यप्रणाली २४ x ७ x ३६५ उपलब्ध केली होती.

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जुलै २०१९ पासून वरील दोन्ही सेवा निःशुल्क केल्या आहेत. सध्या ‘आरटीजीएस’ प्रणालीमध्ये २३७ बँका सहभागी असून, दररोज सहा लाख रुपयांवर व्यवहार होतात, ज्यांचे मूल्य चार लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या व्यवहारांचा सरासरी तिकीट साईज ५८ लाख रुपये होता. यावरून ही प्रणाली मोठ्या उद्योगांना किती उपयुक्त आहे, ते लक्षात येते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

(लेखक बँकिंग क्षेत्रातील जाणकार आहेत.)

loading image