esakal | अर्थबोध : ‘रिच डॅडस, कॅश-फ्लो क्वाड्रंट’

बोलून बातमी शोधा

indian money

लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या प्रसिद्ध ‘रिच डॅड, पुअर डॅड’ या पुस्तकाचा ‘कॅश-फ्लो क्वाड्रंट’ हा दुसरा भाग.

अर्थबोध : ‘रिच डॅडस, कॅश-फ्लो क्वाड्रंट’
sakal_logo
By
अतुल सुळे

लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या प्रसिद्ध ‘रिच डॅड, पुअर डॅड’ या पुस्तकाचा ‘कॅश-फ्लो क्वाड्रंट’ हा दुसरा भाग. नोकरीच्या ‘रॅट रेस’मधून बाहेर पडून लवकरात लवकर श्रीमंत व्हायचे असेल, तर प्रत्येकाला आपण कोणत्या ‘क्वाड्रंट’ (म्हणजे एक चतुर्थांश भाग) मधून सध्या पैसा कमवीत आहोत, याचे विश्लेषण करून आपल्याला कोणत्या ‘कॅश-फ्लो क्वाड्रंट’मध्ये जायचे आहे, ते ठरवावे लागेल, असा महत्त्वाचा संदेश लेखकाने या पुस्तकाद्वारे दिला आहे.
लेखकाच्या ‘रिच डॅड’ने वर्णन केलेले चार कॅश-फ्लो क्वाड्रंट असे -

१) E म्हणजे एम्प्लॉईज : आपल्या पाहण्यातील बहुतांश लोक नोकरीच्या आभासी सुरक्षिततेच्या मागे लागून या ‘क्वाड्रंट’मध्ये राहणे पसंत करतात. हे लोक स्वतःला सोडून आपल्या मालकाला, कर भरून सरकारला आणि हप्ते भरून बँकांना श्रीमंत करीत असतात.

२) S म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड : उत्तम शिक्षण घेतलेले व कौशल्य असलेले हे लोक सर्व गोष्टी स्वतःच करण्याच्या मागे असतात. कारण त्यांना दुसऱ्याला काम सोपविणे आवडत किंवा जमत नाही. उदाहरणार्थ, डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट, सीए. कारण त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर मर्यादा येते.

हेही वाचा - ‘पीपीएफ’कडे आजच लक्ष का द्यायला हवे?

३) B म्हणजे बिझनेस ओनर :  हे लोक एखादे बिझनेस मोडेल शोधून त्यासाठी आवश्यक सिस्टिम व माणसे नेमतात आणि स्वतः दुसरा व्यवसाय सुरू करण्यास मोकळे राहतात. त्यामुळे ते अमर्याद उत्पन्न कमवू शकतात.

४) I म्हणजे इन्व्हेस्टर : ही मंडळी पैशाला कामाला लावतात व स्वतः मोकळे राहतात.

तुम्हाला जर लवकर श्रीमंत व्हायचे असेल, तर E आणि S ‘क्वाड्रंट’कडून B आणि I ‘क्वाड्रंट’कडे प्रवास करावा लागेल, असा लेखकाचा संदेश आहे. ‘आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावरील उत्कृष्ट मार्गदर्शक’ असे या पुस्तकाचे वर्णन करता येईल.