"बुल्डेक्‍स'वर होणार वायदे! 

अतुल सुळे 
Monday, 24 August 2020

कॉन्ट्रॅक्‍ट्‌सचा लॉट साइज 50 आहे. यानिमित्ताने "बुल्डेक्‍स' म्हणजे नक्की काय व या कॉन्ट्रॅक्‍ट्‌सची वैशिष्ट्ये व उपयुक्तता या संबंधीच्या वाचकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्याचा हा प्रयत्न. 

"मल्टी कमोडिटी एक्‍सचेंज'वर (एमसीएक्‍स) "बुल्डेक्‍स' या निर्देशांकावर आधारित कॉन्ट्रॅक्‍टस आजपासून (24 ऑगस्ट) उपलब्ध होणार आहेत. जुलै 2020 मध्ये करण्यात आलेले "मॉक ट्रेडिंग' यशस्वी झाल्यानंतर आजपासून ही कॉन्ट्रॅक्‍ट्‌स "एमसीएक्‍स'वर व्यवहारांसाठी उपलब्ध होणार आहेत. आजपासून सप्टेंबर 2020, ऑक्‍टोबर 2020, नोव्हेंबर 2020 मध्ये संपणारी फ्युचर्स कॉन्ट्रॅक्‍ट्‌स लॉंच होत आहेत. कॉन्ट्रॅक्‍ट्‌सचा लॉट साइज 50 आहे. यानिमित्ताने "बुल्डेक्‍स' म्हणजे नक्की काय व या कॉन्ट्रॅक्‍ट्‌सची वैशिष्ट्ये व उपयुक्तता या संबंधीच्या वाचकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्याचा हा प्रयत्न. 

प्रश्न - "बुल्डेक्‍स'म्हणजे नक्की काय? 

- मल्टी कमोडिटी एक्‍स्चेंजने तयार केलेला देशातील वायदे बाजारातील सोने व चांदी या दोन मौल्यवान धातूंच्या किंमतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निर्देशांकाला "बुलियन इंडेक्‍स' अथवा "एमसीएक्‍स बुल्डेक्‍स' असे म्हणण्यात येते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रश्न - हा निर्देशांक कधीपासून अस्तित्वात आहे? 

- "एमसीएक्‍स'ने हा निर्देशांक डिसेंबर 2019 मध्ये लॉंच केला असला तरी त्याचे ऐतिहासिक मूल्य 2015 पासून उपलब्ध असून, "बेस व्हॅल्यू' 10,000 आहे. सध्या त्याची पातळी 16,500 च्या आसपास आहे. 

प्रश्न - या निर्देशांकात सोने व चांदीचे प्रमाण कसे आहे? 

- या निर्देशांकात सोन्याच्या भावाला 70 टक्के, तर चांदीला 30 टक्के "वेटेज' आहे. 

प्रश्न - या निर्देशांकावर आधारित "फ्युचर्स कॉन्ट्रॅक्‍ट्‌स'चे वैशिष्ट्य काय? 

- या कॉन्ट्रॅक्‍ट्‌सची सेटलमेंट "कॅश' पद्धतीने करण्यात येणार आहे, म्हणजेच डिलिव्हरी देण्या-घेण्याची गरज नसते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रश्न - ही कॉन्ट्रॅक्‍ट्‌स कोणासाठी उपयुक्त आहेत? 

- कमोडिटी बाजारातील "हेजर्स' व संस्था ज्यांना डिलिव्हरी घेण्यात रस नसतो, अशांसाठी ही कॉन्ट्रॅक्‍ट्‌स उपयुक्त ठरू शकतील. 

(लेखक गुंतवणूक क्षेत्राचे जाणकार अभ्यासक आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: atul sule writes article about