esakal | "घरी राहा, सुरक्षित राहा आणि लाखो रुपये जमवा!' वाचा सविस्तर...
sakal

बोलून बातमी शोधा

"घरी राहा, सुरक्षित राहा आणि लाखो रुपये जमवा!' वाचा सविस्तर...

कोरोनाचे महासंकट कधी आटोक्‍यात येईल,  हे कोणीच सांगू शकत नाही;  परंतु त्यामुळे घाबरून न जाता आपण संकटातही संधी शोधली पाहिजे. सध्याचा मंत्र "घरी राहा, सुरक्षित राहा,' असा आहे. 

"घरी राहा, सुरक्षित राहा आणि लाखो रुपये जमवा!' वाचा सविस्तर...

sakal_logo
By
अतुल सुळे

साधारणपणे 2000 मध्ये "डॉट कॉम'चा बुडबुडा फुटण्याआधी "मायक्रोसॉफ्ट'चे संस्थापक आणि त्याकाळचे जगातील सर्वाधिक श्रीमंत बिल गेट्‌स यांची संपत्ती 100 अब्ज डॉलर एवढी झाली होती. त्यावेळी असे गंमतीत म्हटले जायचे, की त्यांना कोठे 100 डॉलरची नोट पडलेली दिसली तरी ते उचलण्याची तसदी घेणार नाहीत. कारण थांबून, वाकून नोट उचलण्यात त्यांचा जेवढा वेळ जाईल, त्या वेळात ते 100 डॉलरपेक्षा किती तरी जास्त कमाई करतील. त्यांचेच मित्र आणि गुंतवणूकगुरू वॉरन बफे यांचा पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र वेगळाच आहे. ते पैशाच्या सध्याच्या मूल्यापेक्षा त्याच्या भविष्यकाळातील किमतीवर लक्ष केंद्रित करतात. हेच 100 डॉलर गुंतवून 15 टक्के परतावा (चक्रवाढ) मिळवता आला तर त्याचे 10 वर्षांत 404 डॉलर, 20 वर्षांत 1637 डॉलर, तर 30 वर्षांत 6621 डॉलर होतील! हा दृष्टिकोन ठेवला असता तर बिल गेट्‌स यांनीसुद्धा 100 डॉलरकडे दुर्लक्ष केले नसते. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

कोरोनाचे प्रकरण देशात दाखल होण्याआधी तरुण पिढी प्रत्येक विकेंडला सुमारे 5 हजार रुपये खर्च करत होती. त्याचा ढोबळमानाने "ब्रेक-अप' असा- 

सकाळी ब्रेकफास्ट रु. 500
दुपारी हॉटेलमध्ये जेवण रु. 1000
दुपारी मल्टीप्लेक्‍समध्ये मूव्ही रु. 500
संध्याकाळी मॉलमध्ये शॉपिंग रु. 1500
रात्री हॉटेलमध्ये जेवण रु. 1500
एकूण खर्च - रु. 5000

गेल्या साडेतीन महिन्यांच्या लॉकडाउनमुळे हॉटेलिंग, शॉपिंग आणि मल्टीप्लेक्‍स थिएटर बंद आहेत व सर्वांनाच आता घरी बसायची सवय झाली आहे. घरचा नाश्‍ता, घरचेच जेवण, टीव्ही/ केबल/ मोबाईलद्वारे करमणूक व अनावश्‍यक खर्चाला फाटा ही नवी "लाइफस्टाइल' अंगवळणी पडू लागली आहे. कोरोनाचे महासंकट कधी आटोक्‍यात येईल, हे कोणीच सांगू शकत नाही; परंतु त्यामुळे घाबरून न जाता आपण संकटातही संधी शोधली पाहिजे. सध्याचा मंत्र "घरी राहा, सुरक्षित राहा,' असा आहे. तो थोडासा वाढवून आपण असे म्हणू शकतो, "घरी राहा, सुरक्षित राहा आणि लाखो रुपये जमवा!' 
यासाठी आपल्याला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे लॉकडाउन संपल्यानंतरही महिन्यातील एका रविवारी घरीच थांबायचे आणि वाचलेल्या पैशाची काही दशकांसाठी म्युच्युअल फंडात "एसआयपी' करायची! 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनी विचारले, "हा "संडे' घरीच बसणार का?', तर त्यांना उत्तर द्यायचे, "तुम क्‍या जानो, एक संडे की किमत'! 

रु. 5 हजारांची "एसआयपी' पुढील 1, 2, 3 दशकांसाठी चालू ठेवली व त्यावर 10 टक्के चक्रवाढ परतावा मिळाल्यास जमणारी रक्कम अशी किती असेल, ते पाहा. 

चक्रवाढ - जगातील आठवे आश्‍चर्य 
-------------------------------------------------------------------- 
तपशील 10 वर्षे 20 वर्षे 30 वर्षे 
--------------------------------------------------------------------- 
स्वत-ची गुंतवणूक (रु.) 6 लाख 12 लाख 18 लाख 
परतावा किंवा नफा (रु.) 3.99 लाख 23.91 लाख 85.14 लाख 
एकूण जमा रक्कम (रु.) 9.99 लाख 35.91 लाख 103.14 लाख 


या रकमेतून तुम्ही नव्या घराचे डाऊन पेमेंट, मुला-मुलींचे शिक्षण-लग्न अथवा स्वत-च्या निवृत्तीचे नियोजन करू शकता. दीर्घ मुदतीत स्वत- जमवलेल्या रकमेच्या किती तरी पटीत परतावा मिळतो तो चक्रवाढीमुळे व त्यामुळेच अल्बर्ट आइनस्टाइन यांनी चक्रवाढीला जगातील "आठवे आश्‍चर्य' म्हटले आहे. 

"50/ 30/ 20 बजेटिंग'चा नियम सांगतो, की तुमच्या कमाईच्या 50 टक्के रक्कम अत्यावश्‍यक गोष्टींसाठी, 30 टक्के कम्फर्ट वा लक्‍झरीसाठी व 20 टक्के बचत वा गुंतवणुकीसाठी राखून ठेवा. आपल्याला थोड्या प्रमाणात "कम्फर्ट' किंवा "लक्‍झरी' कमी करून आपले व आपल्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य अधिक सुरक्षित करता येऊ शकते. 

(लेखक गुंतवणूक विषयाचे अभ्यासक आहेत.) 

(Edited by: Kalyan Bhalerao)