‘अर्थ’बोध : ‘इन्व्हेस्टिंग द टेम्पल्टन वे’

सर जॉन टेम्पल्टन हे प्रख्यात ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टर’ होते आणि त्यांना आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचे जनक मानण्यात येते.
investing the templeton way
investing the templeton waysakal

सर जॉन टेम्पल्टन हे प्रख्यात ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टर’ होते आणि त्यांना आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचे जनक मानण्यात येते. इतर गुंतवणूकदार जेव्हा घाबरून जाऊन शेअर विकत असतात, तेव्हा खरेदी करायला आणि जेव्हा ते लोभी बनून खरेदी करीत असतात, तेव्हा शेअर विकायला प्रचंड मनोधैर्य आणि शिस्त लागते आणि ते ज्याच्याकडे असते, तोच यशस्वी गुंतवणूकदार होऊ शकतो, असे त्यांचे ठाम मत होते. या पुस्तकाच्या लेखकांनी त्यांची गुंतवणूकपद्धत वाचकांपुढे उलगडली आहे.

सर जॉन टेम्पल्टन यांच्या गुंतवणूकपद्धतीतून शिकण्याजोगे काही ठळक मुद्दे असे -

  • जेव्हा कधी शेअर बाजार कोसळतो, तेव्हा सर्व जण खूपच भांबावलेले असतात. अशा वेळी आपली खरेदी करायची ‘विश लिस्ट’ तयार असल्यास आपण शांतचित्ताने खरेदी करू शकतो.

  • शेअरचे भाव अतिशय कोसळले असतील तेव्हाच मोठ्या प्रमाणावर खरेदी करा आणि त्यासाठी भरपूर वाट पाहायची तयारी ठेवा.

  • तुमच्या देशात अशी संधी उपलब्ध नसल्यास जगातील इतर देशात, जेथे खरेदीला योग्य वातावरण आहे तेथे गुंतवणूक करा.

  • दुसऱ्या देशात गुंतवणूक करताना त्या देशाची राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, चलनाची मजबुती, निर्यातक्षमता यांचाही अभ्यास करा.

  • नेहमी, आता काय घडत आहे याचा विचार करण्यापेक्षा भविष्यकाळात काय घडू शकते, याचा मागोवा घ्या.

  • जेव्हा जेव्हा शेअर बाजारात किंवा एखाद्या शेअरच्या भावात मोठी पडझड होते, तेव्हा त्या पडझडीची कारणे नीट समजून घ्या आणि ही कारणे तात्पुरती आहेत, की कायमस्वरूपी याचा विचार करा.

‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ आणि ‘ग्लोबल इन्व्हेस्टिंग’ म्हणजे काय हे नीट समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचणे उपयुक्त ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com