अर्थबोध : ‘द झुरिक ॲक्सिअम्स’

या पुस्तकाचे लेखक मॅक्स गुंथर यांनी काही वर्षे ‘टाइम’ मासिकाचे संपादक म्हणून काम केले व त्यांनी गुंतवणूक या विषयावर अनेक पुस्तके लिहिली आहेत.
The Zurich Axioms
The Zurich Axiomssakal
Summary

या पुस्तकाचे लेखक मॅक्स गुंथर यांनी काही वर्षे ‘टाइम’ मासिकाचे संपादक म्हणून काम केले व त्यांनी गुंतवणूक या विषयावर अनेक पुस्तके लिहिली आहेत.

या पुस्तकाचे लेखक मॅक्स गुंथर यांनी काही वर्षे ‘टाइम’ मासिकाचे संपादक म्हणून काम केले व त्यांनी गुंतवणूक या विषयावर अनेक पुस्तके लिहिली आहेत. स्वित्झर्लंडमधील बँकर्स ‘रिस्क मॅनेजमेंट’साठी पिढ्यानपिढ्या वापरत असलेली १२ मोठी व १६ छोटी स्वयंसिद्ध तत्त्वे, म्हणजे ज्या तत्त्वांना पुराव्याची गरज नसते, ती लेखकाने या पुस्तकात वर्णन केली आहेत. त्यापैकी काही ठळक तत्वे अशी-

  • तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीबद्दल चिंता सतावत नसेल तर तुम्ही पुरेशी जोखीम पत्करत नाही, असे समजावे! धाडसी आयुष्य जगणाऱ्यांसाठी थोडीफार चिंता आवश्यकच असते.

  • नफा कमावण्याची संधी क्वचितच मिळते व त्यामुळे अशी संधी मिळेल तेव्हा ती वाया घालवू नका.

  • गुंतवणूक करताना प्रत्येकाच्या हातून चुका होतात. परंतु, अशी चूक झाल्यास प्रार्थना न करता आपली चूक मान्य करा आणि अशा गुंतवणुकीतून ताबडतोब बाहेर पडा.

  • भविष्यात काय होईल हे कोणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही, त्यामुळे सर्व भाकीतांकडे दुर्लक्ष करा. बरीच तज्ज्ञ मंडळी सतत उलट-सुलट भाकीते करीत असतात व त्यातील बरोबर आलेल्या भाकितांचा ढिंढोरा पिटत असतात, हे ध्यानात घ्या.

  • अर्थविश्वात कोणतेच पॅटर्न अस्तित्वात नसतात व त्यामुळे नको तेथे पॅटर्न शोधायचा प्रयत्न करू नका.

  • कोणत्याही गुंतवणुकीत भावनिकरित्या गुंतून पडू नका. चांगली संधी इतरत्र उपलब्ध असल्यास जुन्या गुंतवणुकीतून बाहेर पडा.

  • गुंतवणूक करताना आशावादी असावे. परंतु, त्याला सबळ कारणे असावीत. आशावादाला नेहमी आत्मविश्वासाची जोड असावी. हा आत्मविश्वास असा असावा, की माझा निर्णय चुकल्यास मी फार मोठे नुकसान न होता या गुंतवणुकीतून बाहेर पडू शकेन.

गुंतवणूक म्हणजे ‘रिस्क’ आणि ‘रिवॉर्ड’ या दोन खांबांवरील तारेवरची कसरत असते व ही कसरत यशस्वीरीत्या कशी पार पाडायची, हे जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com