ऑटो सेक्टरमध्ये घसरण पण मारुतीच्या शेअरमध्ये वाढ

3 कमकुवत वर्षांनंतर आता कंपनीच्या एमएसआयएलच्या कमाईत तेजी दिसू शकते
maruti company shares increased in share marketing
maruti company shares increased in share marketing
Summary

3 कमकुवत वर्षांनंतर आता कंपनीच्या एमएसआयएलच्या कमाईत तेजी दिसू शकते

ऑटो सेक्टरमध्ये गुरुवारी घसरण दिसून आली. बाजारातील घसरणीच्या काळात, जर गुंतवणूकदार पोर्टफोलिओमध्ये मजबूत स्टॉक शोधत असाल तर ते ऑटो सेक्टरमधील मारुतीच्या (Maruti) स्टॉकचा विचार करु शकता. ब्रोकरेजने मारुतीचे (Maruti) शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (maruti company shares increased in share marketing)

ब्रोकरेज कंपनी जेफरीजने या शेअर्समध्ये खरेदी रेटींग कायम ठेवली आहे आणि 10,250 रुपयांचे टारगेट दिले आहे. 3 कमकुवत वर्षांनंतर आता कंपनीच्या एमएसआयएलच्या (MSIL's) कमाईत तेजी दिसू शकते असे जेफरीजने आपल्या अहवालात म्हटले आहे . याशिवाय आर्थिक वर्ष 22-24 मध्ये सार्वजनिक वाहनांची मागणी (Public Vehicle Demand) आधीपेक्षा मजबूत झाली आहे.

maruti company shares increased in share marketing
या स्टॉकची कमाल, 10 वर्षात 6000% वाढ…

तर, ब्रोकरेज कंपनी क्रेडिट सुईसने या स्टॉकवर आउटपरफॉर्म रेटिंग कायम ठेवली आहे आणि 10,103 रुपये टारगेट दिले आहे. ब्रोकरेज कंपनीच्या मते, हा शेअर खरेदी केल्यास 28 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

टाटा मोटर्स (Tata Motors)

जागतिक ब्रोकरेज फर्म नोमुराने टाटा मोटर्सवर आपला बाय रेटींग कायम ठेवली आहे. तर टारगेट 471 रुपये ठेवण्यात आले आहे. त्याच वेळी, क्रेडिट सुइसने स्टॉकवर न्यूट्रलचे रेटिंग कायम ठेवले आहे. तर टारगेट 438 रुपये ठेवण्यात आले आहे. 15 जून 2022 रोजी हा शेअर 414 रुपयांवर होता.

maruti company shares increased in share marketing
शेअर बाजारावर मंदीचं सावट? Sensex अन् Nifty घसरणीसह सुरू

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com