शेअर बाजारावर मंदीचं सावट? Sensex अन् Nifty घसरणीसह सुरू

आठवड्याभरापासून शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू आहे.
Todays Share Market Updates
Todays Share Market Updatessakal

आठवड्याभरापासून शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू आहे. या पाच दिवसात शेअर बाजाराचे चित्र फारसे समाधानकारक नव्हते. अशात आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही शेअर बाजार घसरणीसह सुरू झाला.आज सेन्सेक्स 1,045 अंकाच्या घसरणीसह 51,495 वर सुरू झाला तर निफ्टी 85 अंकाच्या घसरणीसह 15,270 वर सुरू झाला. (share market opening update 17 june 2022)

Todays Share Market Updates
सोने-चांदी महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

गेल्या 5 दिवसांपासून सेन्सेक्स, निफ्टीमध्ये सातत्याने घसरण होत आहे. गुरुवारीही सेन्सेक्स 1046 अंकांनी घसरून 51 हजार 400 च्या जवळ बंद झाला आहे. दुसरीकडे, निफ्टी 332 अंकांनी घसरून 15300 च्या जवळ बंद झाला.

BSE चे सर्व सेक्टर इंडेक्स लाल चिन्हात बंद झाले. मेटल आणि फार्मा निर्देशांक इंडेक्स वर्षाच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. सर्वात मोठी घसरण मेटल आणि रियल्टी शेअर्समध्ये झाली आहे. आयटी, ऊर्जा, वाहन इंडेक्सही 2 टक्क्यांहून अधिक घसरलेत.

Todays Share Market Updates
Share Market: रुस्तमजी ग्रुपच्या कीस्टोन रियल्टर्सचा IPO येण्याची शक्यता

निफ्टीने 15660-15700 चा महत्त्वाचा सपोर्ट तोडल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे दीपक जसानी म्हणाले. ही पातळी आता निफ्टीसाठी रझिस्टंस बनली आहे. कोणत्याही घसरणीत, निफ्टीला 15315 वर थोडा सपोर्ट मिळू शकतो. हा सपोर्टही तुटला तर निफ्टी पुढील काही दिवस किंवा आठवड्यात 14340 च्या दिशेने जाऊ शकतो.

Todays Share Market Updates
विमान प्रवाशांसाठी वाईट बातमी; SpiceJet चं तिकीट महागणार; जाणून घ्या किती होणार किंमत?

फेडरल रिजर्व्हकडून मोठी व्याजदरवाढ झाल्याने शेअर बाजारात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे मंदीची भीती निर्माण झाली आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.75 टक्के वाढ जाहीर केली आहे. 28 वर्षांतील ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिकेतील महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे कठोर पाऊल यूएस फेडरल बँकने उचलले आहे. अमेरीकेत महागाई दर हा 40 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहे. मे महिन्यात हा महागाई दर 8.6 टक्के नोंदवला गेला. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या या सेंट्रल बँकेने यावर तोडगा म्हणून व्याजदरात वाढ केली आहे.

0.75 टक्क्यांनी झालेली ही व्याजवाढ ही 1994 नंतरची सर्वाधिक वाढ आहे. सध्या यूएस फेडच्या व्याजदरात वाढ झाल्यामुळे भारतीय चलनावर त्याचा मोठा परिणाम दिसत आहे.

Todays Share Market Updates
पर्सनल लोन घेताय? मग 'या' गोष्टी नक्की जाणून घ्या!

आजच टॉप 10 शेअर्स कोणते ?

हिन्दाल्को (HINDALCO)
टाटा स्टील (TATASTEEL)
ओएनजीसी (ONGC)
कोल इंडिया (COALINDIA)
टाटा मोटर्स (TATAMOTORS)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
लॉरस लॅब (LAURUSLABS)
एल अँड टी (LTTS)
व्होल्टास (VOLTAS)
आयआरसीटीसी (IRCTC)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com