मानवी हस्तक्षेपाशिवाय वाहनांचे इन्स्पेक्शन करून देणारी 'इन्स्पेक्टलॅब्ज स्टार्टअप'

Inspektlabs startup
Inspektlabs startupSakal

भाडेतत्त्वावर घेतलेल्या मोटारीला झालेल्या नुकसानाची भरपाई विनाकारण देण्याची वेळ तुमच्यावर कधी आली आहे का? किंवा तुम्ही तुमच्या मोटारीला झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्यास अकारण अपात्र ठरल्याचा अनुभव घेतला आहे?

आयआयटी दिल्लीचा विद्यार्थी असलेल्या देवेश त्रिवेदीला असाच त्रासदायक अनुभव आला पण त्याने तो विषय सोडून नाही दिला. तंत्रज्ञानाच्या आधारे आणि मानवी-हस्तक्षेप कमी करून या समस्येवर तोडगा काढण्याचा निश्चय त्याने केला आणि आपला मित्र संचित याच्यासोबतीने इन्स्पेक्टलॅब्ज (Inspektlabs) ही इन्स्पेक्शन-अॅज-ए-सर्व्हिस साॅफ्टवेअर (inspection-as-a-service software) स्टार्टअप 2018 मध्ये सुरू केली.

कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटलिजन्स) आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाधारित साॅफ्टवेअर वापरून इन्स्पेक्टलॅब्ज ही स्टार्टअप तुमच्या वाहनाचे फोटो आणि व्हीडिओ माध्यमातून इन्स्पेक्शन करते. इन्स्पेक्टलॅब्ज वापरणाऱ्या आॅटोमोटिव्ह आणि विमा कंपन्यांना फोटो व व्हीडिओ इन्स्पेक्शनकरिता लागणारा वेळ आणि खर्च सुमारे 95 टक्क्यांनी कमी होतो, असा दावा कंपनीने केला आहे. (Automate Inspections with AI by Inspektlabs)

Inspektlabs startup
खाद्यतेलामुळे खिशाला कात्री, वर्षभरात किंमत झाली दुप्पट

देवेश हा 2008 बॅचचा आयआयटी दिल्लीचा माजी विद्यार्थी आहे. एका खासगी कंपनीमध्ये त्याने साडेतीन वर्ष सिनियर डेटा सायन्टिस्ट म्हणून तर अन्य एका कंपनीत व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून साडेचार वर्ष काम केले व त्यानंतर 2013 मध्ये इंडियन स्कूल आॅफ बिझनेसममधून त्याने एमबीए शिक्षण पूर्ण केले आहे.

देवेशचा सहकारी संचित हा काॅम्प्युटर व्हिजन स्पेशलिस्ट असून तो आयआयटी दिल्लीचा 2009 बॅचचा विद्यार्थी आहे. त्याने देखील इंडियन स्कूल आॅफ बिझनेसमधून 2014 मध्ये एमबीए शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने इंडियन आॅईल काॅर्पोरेशन, विप्रो आणि आयबीएम कंपन्यांमध्ये सहा वर्ष काम केले. झोमॅटो कंपनीमध्ये झोमॅटो गोल्ड विभागाचा सहाय्यक उपाध्यक्ष म्हणून तो 2018 मध्ये रुजू झाला होता. त्याचसुमारास स्वतःची कंपनी स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देवेशची आणि संचितची भेट झाली. (Inspektlabs startup)

देवेश म्हणाला, “आमची सेवा ही काॅम्प्युटर व्हिजन प्लॅटफाॅर्मवर आधारित आहे. काॅम्प्युटर व्हिजन म्हणजे आर्टिफिशियल इंटलिजन्स आणि मशीन लर्निगचा उपयोग इमेज आणि व्हीडिओमधून माहिती मिळविणे आणि त्या माहितीमधून अर्थपूर्ण असे निष्कर्ष काढणे.”

Inspektlabs startup
लाॅकडाऊन २.० इफेक्टः मार्केट रिकव्हरीसाठी लागू शकतात किमान ३ वर्ष

“माहिती मिळविण्यासाठी आणि त्यातून निष्कर्ष काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात संदर्भ-स्वरुपात डेटा असावा लागतो. त्यामुळे आम्ही तो मोठ्या कष्टाने मिळविला आणि आमची स्वतःची डॅमेज्ड-कार लायब्ररी तयार केली. त्यामुळे ग्राहकाच्या किंवा प्रत्यक्ष मालकाच्या वाहनाचे फोटो किंवा व्हीडिओ साठवून ठेवण्याची गरज आम्हाला भासत नाही. त्याचबरोबर इमेज आणि व्हीडिओचे प्रोसेसिंग करताना आम्ही त्यासंबंधी सर्व वैयक्तिक, संवदेनशील व गोपनीय स्वरुपाची माहिती काढून टाकतो.” (Automate Inspections with AI by Inspektlabs)

“सध्या आम्ही देत असलेल्या सेवेमध्ये विमा कंपन्या आणि आॅटोमोटिव्ह कंपन्या या आमच्या ग्राहक आहेत. आमचे पहिले ग्राहक ही लिबर्टी जनरल इन्श्युरन्स कंपनी होती. कंपनी स्थापनेनंतरच्या सुरवातीच्या काळात मी स्वतःचे पैसे गुंतवले होते मात्र त्यानंतर व्यवसाय विस्तारासाठी आम्ही फंडिंग मिळविले. जुलै 2020 मध्ये बेटर कॅपिटलचे वैभव डोमकुंडवार, टायटन कॅपिटलचे कुणाल बहल आणि रोहित बन्सल तसेच अन्य एंजल इन्व्हेस्टर्सने आमच्या कंपनीत गुंतवणूक केली,” असे देवेशने सांगितले.

Inspektlabs startup
कोविडकाळातही ‘त्यांच्या’ श्रीमंतीत भरच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com