अॅक्सिस बॅंकेच्या एमडी आणि सीईओ शिखा शर्मा निवृत्त

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 जानेवारी 2019

मुंबई: अॅक्सिस बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा निवृत्त झाल्या आहेत. शिखा शर्मा यांच्या जागी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर अमिताभ चौधरी यांची नियुक्ती झाली आहे. अमिताभ चौधरी यांची नियुक्ती 1 जानेवारी 2019 पासून लागू झाली आहे. 

चौधरी हे एचडीएफसी स्टॅंडर्ड लाईफ इन्श्युरन्स कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. याआधी 8 डिसेंबरला अॅक्सिस बॅंकेने चौधरी यांची बॅंकेच्या संचालक मंडळावर अतिरिक्त संचालकपदावर नियुक्ती केली होती. 54 वर्षांच्या अमिताभ चौधरी यांनी 1987 मध्ये बॅंक ऑफ अमेरिकामधून आपल्या कॉर्पोरेट बँकिंगमधील करियरची सुरूवात केली होती. त्यांनी पिलानीच्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅंड सायन्समधून बी.टेकची पदवी मिळवली आहे. त्याचबरोबर अहमदाबादच्या आयआयएममधून एमबीएदेखील केले आहे. 

Web Title: Axis Bank MD & CEO Shikha Sharma retires

टॅग्स