
कामकाजाची सुरूवात करण्यापूर्वी कार्यालये आणि कारखान्याला आधीच निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.सोशल डिस्टंसिंगचे निकषदेखील काटेकोर पाळण्यात येत आहेत
बजाज ऑटो या देशातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपनीने देशभरातील आपले शोरुम (डिलरशीप) आणि सर्व्हिस सेंटर सुरू केले आहेत. सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही नियम शिथिल केल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रशासनाची परवानगी घेतल्यानंतर ४ मे पासून कंपनीने शोरुम आणि सर्व्हिस सेंटर सुरू करण्यास हालचालीस सुरूवात केली होती.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सर्वच शोरुम आणि सर्व्हिस सेंटरमध्ये ग्राहक आणि कर्मचारी यांच्यातील सुरक्षित अंतर राखत आणि इतर निकषांचे पालन करून कामकाज केले जात असल्याची माहिती बजाज ऑटोने दिली आहे. 'कोविड-१९ महामारीनंतरच्या नव्या परिस्थितीत काम करण्यासाठी भारत तयार होतो आहे. बजाज ऑटोनेसुद्धा यादृष्टीने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. वर्कशॉप आणि शोरुमची सुरूवात करणे हे नव्या सुरूवातीसंदर्भातील एक पाऊल आहे', असे मत बजाज ऑटो लि.चे कार्यकारी संचालक राकेश शर्मा यांनी व्यक्त केले आहे.
* बजाज ऑटोचे शोरुम आणि सर्व्हिस सेंटर सुरू
* सोशल डिस्टंसिंगसह सर्व निकषांचे पालन
* नव्या सुरूवातीसाठी कंपनीचे पहिले पाऊल
रक्षितता, वेग आणि कार्यक्षमता यांची खबरदारी घेत सुरक्षित अंतर राखत काम करण्यासाठी नवीन कार्यपद्धती अवलंबण्यात आली आहे. कामकाजाची सुरूवात करण्यापूर्वी कार्यालये आणि कारखान्याला आधीच निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. सोशल डिस्टंसिंगचे निकषदेखील काटेकोर पाळण्यात येत आहेत, अशी माहीत कंपनीनी दिली आहे. प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांची थर्मल स्किनिंग केली जाते आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची नियमितपणे देखरेख केली जाते आहे, असेही कंपनीने सांगितले आहे.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे - क्लिक करा
ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कामकाजाचे प्राधान्यक्रम ठरवण्यात आले आहे. आमचे वर्कशॉप आणि इंजिनियर गरजेनुरूप सर्व प्रकारची सेवा पुरवण्यास तत्पर आहेत. ग्राहकांना सर्व सेवा पुरवली जाईल, असेही शर्मा यांनी सांगितले आहे.
बजाज ऑटो ही दुचाकीच्या क्षेत्रातील देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे.