esakal | बजाज ऑटोचा वेग मंदावला
sakal

बोलून बातमी शोधा

बजाज ऑटोचा वेग मंदावला

बजाज ऑटोचा वेग मंदावला

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई: बजाज ऑटो या देशातील आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपनीला जूनअखेर सरलेल्या तिमाहीत 1,012.17 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. बजाज ऑटोच्या निव्वळ नफ्यात 1 टक्क्याची वाढ झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने 1,115.2 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. कंपनीचा एकत्रित महसूल 7,627.9 कोटी रुपयांवरून 7,756 कोटी रुपयांवर पोचला आहे. सरलेल्या तिमाहीत कंपनीने 12 लाख 47 हजार 174 वाहनांची विक्री केली आहे. 

कंपनीच्या मार्जिनमध्येही घट होत ते 18.3 टक्क्यांवरून 16.1 टक्क्यांवर आले आहे. 30 जून 2019 अखेर बजाज ऑटोकडे 17,126 कोटी रुपयांची रोकड उपलब्ध आहे. देशांतर्गत मोटरसायकलच्या व्यवसायात कंपनीने 3 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मोटरसायकलच्या बाजारपेठेत कंपनीचा वाटा 16.3 टक्क्यांचा आहे. पल्सर आणि अॅवेंजर या मॉडेलचा 2,61,000 वाहनांचा खप झाला आहे. आज मुंबई शेअर बाजारात बजाज ऑटोचा शेअर 3.12 टक्क्यांनी म्हणजेच 79.30 रुपयांनी वधारला असून तो 2624.45 रुपयांवर व्यवहार करतो आहे. 

loading image