बजाज फायनान्सची तडाखेबंद कामगिरी, नफ्यात 43 टक्के वाढ

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 जुलै 2019

मुंबई: बजाज फायनान्सने जूनअखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीत 1,195 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. बजाज फायनान्सच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या या कालावधीशी तुलना करता 43 टक्क्यांची वाढ झाली आहे. शिवाय कंपनीच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेत चांगलीच वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत कंपनीला 836 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

 बजाज फायनान्सच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता 41 टक्क्यांनी वाढून 91,287 कोटी रुपयांवरून 1,28,898 कोटी रुपयांवर पोचली आहे. कंपनीकडून घेतल्या गेलेल्या नव्या कर्जाच्या प्रमाणात 29 टक्क्यांची वाढ होत त्यांची संख्या 50 लाख 63 हजारांवरून 70 लाख 27 हजारांवर पोचली आहे. कंपनीच्या एकूण थकित कर्जात किरकोळ वाढ झाली आहे. कंपनीला निव्वळ व्याजातून मिळालेले उत्पन्न 43 टक्क्यांनी वाढून 2,579 कोटी रुपयांवरून 3,695 कोटी रुपयांवर पोचले आहे. कंपनीचे एकूण थकित कर्ज आणि निव्वळ थकित कर्ज अनुक्रमे 1.60 टक्के आणि 0.64 टक्के इतके आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bajaj Finance Q1 Results Net profit surges 43%