esakal | बँक ऑफ बडोद्याचं कर्ज झालं स्वस्त, जाणून घ्या किती मिळाली सूट 
sakal

बोलून बातमी शोधा

बँक ऑफ बडोद्याचं कर्ज झालं स्वस्त, जाणून घ्या किती मिळाली सूट 

वर्ष उलटलं तरिही कोरोनाच्या प्रभावामुळे देशाची अर्थव्यवस्था बिकटच आहे

बँक ऑफ बडोद्याचं कर्ज झालं स्वस्त, जाणून घ्या किती मिळाली सूट 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वर्षभरापासून कोरोना महामारीनं देशाच्या आर्थिक आणि सामाजिकतेवर थेट परिणाम केला आहे. वर्ष उलटलं तरिही कोरोनाच्या प्रभावामुळे देशाची अर्थव्यवस्था बिकटच आहे. अशात आता अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बऱ्याच बँका, व्याज दरांमध्ये कपात करत आहेत. सरकारकडूनही त्ंयाच्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदानेही कोरोना काळात आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. बँक ऑफ बडोद्यानं आपल्या रेपो लिंक्ड लेन्डिंग रेट (आरएलएलआर) १० बेसिस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्क्यांनी कमी केले आहेत. सोमवारी बँक ऑफ बडोद्यानं ही घोषणा केली आहे. 

बँक ऑफ बडोद्यानं १५ मार्च, सोमवारी रेपो लिंक्ड लेन्डिंग रेटमध्ये कपात केल्याची घोषणा केली. बँकेच्या या घोषणेनंतर आरएलएलआर  ६.८५ वरुन ६.७५ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांना गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक, कार लोन किंवा वैयक्तिक कर्ज घेणार्‍या ग्राहकांना फायदा होणार आहे.  

हेही वाचा : पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा तुमच्या शहरातले आजचे दर

BHIM UPI वरुन डिजि​टल पेमेंटला अडचण येतेय? इथं करा तक्रार

बँक ऑफ बडोद्यानं जारी केलेल्या माहितीनुसार, आरएलएलआर कपात केल्यानंतर गृह कर्जावरील व्याज ६.७५ टक्के आणि वाहन कर्जावर ७ टक्क्यांपर्यंत कमी होईल. त्याचबरोबर दुसर्‍या तारण कर्जावर ७.९५ टक्के आणि शिक्षण कर्जावर ६.७५ टक्के कर आकारला जाईल. बँक ऑफ बडोद्याचे महाप्रबंधक हर्षद कुमार सोळंकी म्हणाले की,  ''रेपो दरांवरील व्याजदरात कपात केल्यामुळे आमचं कर्ज ग्राहकांसाठी आणखी स्वस्त झालं आहे. आम्हाला आशा आहे की, डिजिटल प्रक्रियेतही आम्ही अनेक बदल करण्याची तयारी सुरु केली आहे. आशा आहे की, या बदलामुळे ग्राहकांची वेगानं कामं होतील. ''

हेही वाचा :

Mutual Fund च्या तीन जबरदस्त स्कीम; वर्षभरात लाखाचे होतील दोन लाख

पोस्टाची भन्नाट योजना; आता घरबसल्या प्रत्येक महिन्याला होणार कमाई

अशी 9 कामे जी तुम्हाला 31 मार्चच्या आधीच करावी लागतील पूर्ण

loading image