‘ड्रॅगन’चा बॅंकिंगमध्ये शिरकाव

पीटीआय
गुरुवार, 5 जुलै 2018

नवी दिल्ली - ‘बॅंक ऑफ चायना’ला भारतात व्यवसाय करण्यास रिझर्व्ह बॅंकेने परवानगी दिली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली. त्यामुळे बॅंक ऑफ चायनाने आता भारतात शिरकाव केला आहे. 

‘बॅंक ऑफ चायना’ला भारतात शाखा स्थापन करण्यास परवानगी देण्यात येईल, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांना दिले होते. चीनमध्ये क्विंगडो येथे मागील महिन्यात दोघांची भेट झाली होती. त्या वेळी मोदी यांनी हे आश्‍वासन दिले होते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बॅंक ऑफ चायना’ला भारतात पहिली शाखा सुरू करण्यास रिझर्व्ह बॅंकेने परवाना दिला आहे. नरेंद्र मोदी यांनी चीनच्या अध्यक्षांना दिलेल्या आश्‍वासनानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. 

चीनमधील सरकारी मालकीच्या मोजक्‍या व्यावसायिक बॅंकांपैकी ‘बॅंका ऑफ चायना’ आहे. भारत आणि चीनमध्ये सीमेसह अनेक मुद्द्यांवर ताणतणाव असतानाही आर्थिक संबंध विस्तारण्यावर दोन्ही देश भर देत आहेत. गेल्या वर्षी डोकलाममध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा सुरू केली आहे. संबंधांतील तणाव दूर करण्यासाठी दोन्ही देश पावले उचलू लागले आहेत.

चीनचे संरक्षणमंत्री लवकरच भारतात 
चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंघे लवकरच भारत दौऱ्यावर येणे अपेक्षित आहे. भारत आणि चीनचे अधिकारी या दौऱ्याची अंतिम तारीख ठरविण्याच्या प्रक्रियेत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Bank of China Business Reserve bank of India