सणासुदीत कर्जमागणी वाढली; RBI च्या अहवालातील माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RBI

सणासुदीत कर्जमागणी वाढली; RBI च्या अहवालातील माहिती

मुंबई : सणासुदीच्या दिवसात बँका (Bank) आणि वित्तसंस्थांकडील (Financial institution) कर्जांच्या मागणीत (loan demand) वाढ झाल्याने अर्थजगतात उत्साह पसरला आहे. दीड वर्षांपूर्वी कोरोनाचा फैलाव (corona infection) सुरु झाल्यावर प्रथमच कर्जमागणीत वाढ झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून (RBI Report) समोर आले आहे.

हेही वाचा: मुंबई : 26 /11 च्या शहिदांना मुंबई पोलिसांनी वाहिली श्रद्धांजली

पाच नोव्हेंबरला बँकांकडील एकूण कर्जे 110 लाखकोटी रुपये होती. गेल्यावर्षीपेक्षा त्यात 7.3 टक्के वाढ झाली. सणासुदीच्या काळात लोकांनी घरगुती उपयोगासाठी आवश्यक वस्तू घेण्यासाठी कर्जे काढली. आठ ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या साधारण महिन्याभराच्या काळात कर्जांमध्ये 1.35 लाखकोटी रुपये वाढ झाली. कोरोनापूर्व काळात म्हणजे गेल्यावर्षीच्या एप्रिलपर्यंत कर्जमागणीत सात टक्के वाढ झाली होती. त्यानंतर दीडवर्ष ती वाढ 5.1 ते 6.9 टक्क्यांच्या टप्प्यातच फिरत होती.

गेल्या वर्षभरात 7 लाखकोटी रुपयांची कर्जे घेण्यात आली. कर्जांचे कमी झालेले व्याजदर, सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांनी केलेली खरेदी व लॉकडाऊनचे निर्बंध उठवल्याने लोकांचा वाढलेला उत्साह यामुळे कर्जाची मागणी वाढल्याचे सांगितले जात आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यानही कर्जांना मागणी कमी होती. मात्र यावर्षीच्या जूननंतर निर्बंध सैल झाल्यावर मागणी वाढली. यावर्षीच्या 4 जूनपर्यंतच्या पंधरवड्यात कर्जमागणीत 5.7 टक्के वाढ झाली. तर 22 ऑक्टोबरपर्यंतच्या पंधरवड्यातील कर्जमागणी 6.8 टक्के वाढली, असे केअर रेटिंग मानांकन संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.

यावर्षातही अशीच परिस्थिती कायम राहणार असून येत्या वर्षातही साडेसात ते आठ टक्के दराने कर्जमागणीत वाढ होईल, असा अंदाज आहे. आता अर्थचक्र वेगाने पूर्वपदावर येत असून, कर्जांचे व्याजदर अजूनही कमीच आहेत, त्याचबरोबर किरकोळ व्यापारालाही प्रोत्साहन मिळत असल्याने उत्पादनही वेग घेत आहे. अर्थात उद्योगांची कर्जमागणी तसेच सेवाक्षेत्राची कर्जमागणी यापेक्षा सामान्य ग्राहकांची कर्जमागणी वाढेल, असेही सांगितले जात आहे.

loading image
go to top