मुंबई : 26 /11 च्या शहिदांना मुंबई पोलिसांनी वाहिली श्रद्धांजली | Mumbai terrorist Attack | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai police

मुंबई : 26 /11 च्या शहिदांना मुंबई पोलिसांनी वाहिली श्रद्धांजली

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 26/11 च्या अतिरेकी हल्याला (Mumbai terrorist attack) 13 वर्ष पूर्ण झाली. 26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री मुंबईत एकाच वेळी चार ठिकणी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. या हल्यात शहिद झालेल्या जवानांना (Martyr police) मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात तयार करण्यात आलेल्या शहीद स्मारकात श्रद्धांजली वाहण्यात आली. गिरगाव चौपाटी (Girgaon beach), सीएसटी रेल्वे स्टेशन (CSMT) अशा अनेक ठिकाणी शहिदांना आदरांजली वाहत (Tributes tp martyr) त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा: पॉझिटिव्हीटी दर 5 टक्क्यांहून कमी; 11 जिल्ह्यांत मात्र कोविडचा धोका कायम

26 नोव्हेंबरचा हल्ला हा मुंबईच नाही तर संपुर्ण देशासाठी काधी विसरता न येणारा हल्ला होता. भारतात अतिरेकी हल्ले नविन नाहीत, पण हा हल्ला भारतासह संपुर्ण जगाला हादरवून सोडणारा होता. यात परदेशी नागरिकांना लक्ष्य करण्यात आलं होतं. हल्यात मृत्यू झालेल्या 166 नगारीकांमध्ये अनेक परदेशी नागरीकांचा समावेश होता.

Mumbai police

Mumbai police

जिवंत पकडण्यात आलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब हा या हल्याचा मुख्य साक्षीदार होता. त्याच्यावर खटला चालवून त्याला 2012 मध्ये फाशी देण्यात आली. नेहमीप्रमाणेच याही वेळी पाकिस्ताननं हल्याची जबाबदारी घेतली नाही, पण कसाबला जिवंत पकडल्यानंतर मात्र जागतिक पातळीवर पाकिस्तानची नाचक्की झाली होती.

या हल्यात मुंबई पोलिसांनी काही मोठे अधिकारीही गमावले होते. यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अतिरीक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, एन्काऊंटर स्पेशलिस्ट पोलीस निरीक्षक विजय साळसकर अशा बहादुर अधिकाऱ्यांना या हल्यात विरमरण आलं होतं.

loading image
go to top