esakal | Bank Holiday calender 2021 - नव्या वर्षात बँकांना कधी असणार सुट्टी; वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

bank holidays

रविवारी लागून असलेल्या या सुट्ट्यांमुळे बँकेचं कामकाज दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस सलग बंद राहू शकतं. नव्या वर्षात अशा जवळपास 50 हून अधिक सुट्ट्या आहेत.

Bank Holiday calender 2021 - नव्या वर्षात बँकांना कधी असणार सुट्टी; वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवीन वर्षांच्या स्वागतासाठी आता फक्त एक आठवडा उरला आहे. 2020 हे वर्ष कोरोनामुळे लोकांना घरातच काढावं लागलं. त्यामुळे 2021 मध्ये तरी सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. कोरोना, लॉकडाऊन, अनलॉक आणि निर्बंधामुळे लोकांना सुट्ट्या असूनही घरातच वेळ घालवावा लागला आणि एन्जॉय करता आलं नाही. 

नव्या वर्षात रविवारला जोडून येणाऱ्या अशा 50 पेक्षा जास्त सुट्ट्या आहेत. बँकेच्या सुट्ट्यांची लिस्ट सध्या समोर आली असून यात रविवार वगळता 50 हून अधिक सुट्ट्या आहेत. नववर्ष शुक्रवारी सुरु होत असल्यानं सुरुवातीलाच लाँग विकेंड साजरा करता येणार आहे. जानेवारी महिन्यात रविवार सोडून चार सुट्ट्या आहेत. 

जानेवारी 2021

9 जानेवारी - दुसरा शनिवार

14 जानेवारी - गुरुवार- मकर संक्रांत

23 जानेवारी - चौथा शनिवार

26 जानेवारी - मंगळवार- प्रजासत्ताक दिन

फेब्रुवारी 2021

13 फेब्रुवारी - दुसरा शनिवार

16 फेब्रुवारी - मंगळवार - वसंत पंचमी

27 फेब्रुवारी - चौथा शनिवार

हे वाचा - नवीन वर्षापासून मोबाईल ते बँकिंगपर्यंतचे नियम बदलणार; त्याविषयी जाणून घ्या

मार्च 2021

11 मार्च - गुरुवार- महाशिवरात्री

13 मार्च - दूसरा शनिवार

27 मार्च - चौथा शनिवार

29 मार्च - सोमवार- धुलिवंदन

एप्रिल 2021

2 एप्रिल - शुक्रवार - गुड फ्रायडे

8 एप्रिल - गुरुवार - बुद्ध पौर्णिमा

10 एप्रिल - दुसरा शनिवार

14 एप्रिल - गुरुवार - आंबेडकर जयंती

21 एप्रिल - बुधवार - राम नवमी

24 एप्रिल - चौथा शनिवार

25 एप्रिल- रविवार - महावीर जयंती

मे 2021

1 मे - शनिवार - कामगार दिन

8 मे - दुसरा शनिवार

12 मे - बुधवार-ईद-उल-फितर

22 मे - चौथा शनिवार

हे वाचा - एप्रिल महिन्यापासून तुमच्या हातात येणारा पगार होणार कमी  

जून 2021

12 जून - दूसरा शनिवार

26 जून - चौथा शनिवार

जुलै 2021

10 जुलै - दुसरा शनिवार

20 जुलै - मंगळवार - बकरीद / ईद अल-अदा

24 जुलै - चौथा शनिवार

ऑगस्ट 2021

10 ऑगस्ट -  मंगळवार - मोहरम

14 ऑगस्ट - दुसरा शनिवार

15 ऑगस्ट - रविवार - स्वातंत्र्य दिन

22 ऑगस्ट - रविवार - रक्षाबंधन

28 ऑगस्ट - चौथा शनिवार

30 ऑगस्ट - सोमवार - कृष्णा जन्माष्टमी

सप्टेंबर 2021

10 सप्टेंबर - शुक्रवार - गणेश चतुर्थी

11 सप्टेंबर - शनिवार - दुसरा शनिवार

25 सप्टेंबर - शनिवार - चौथा शनिवार

हे वाचा - इनकम टॅक्स रिटर्न भरताय; मग नक्कीच बातमी वाचा  

ऑक्टोबर 2021

2 ऑक्टोबर - शनिवार - गांधी जयंती

9 ऑक्टोबर - दुसरा शनिवार

15 ऑक्टोबर - शुक्रवार - दसरा (विजयादशमी)

18 ऑक्टोबर - सोमवार - ईद-ए-मिलाद

23 ऑक्टोबर - चौथा शनिवार

नोव्हेंबर 2021

4 नोव्हेंबर - गुरुवार - दिपावली

6 नोव्हेंबर - शनिवार - भाऊबीज

13 नोव्हेंबर - दुसरा शनिवार

19 नोव्हेंबर - शुक्रवार - गुरु नानक जयंती

27 नोव्हेंबर - चौथा शनिवार

डिसेंबर 2021

11 डिसेंबर - दुसरा शनिवार

25 डिसेंबर - शनिवार (चौथा) - ख्रिसमस

रविवारी लागून असलेल्या या सुट्ट्यांमुळे बँकेचं कामकाज दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस सलग बंद राहू शकतं. अशा वेळी तुमची बँकेतील कामे वेळेत पुर्ण कऱण्यासाठी ही यादी पाहून सुट्ट्यांचा अंदाज येईल आणि वेळेत कामे उरकता येतील. 
 

loading image