Bank Holidays In 2023: महत्वाची कामे पुढल्या वर्षावर ढकलू नका; जानेवारीत एवढे दिवस बँक असणार बंद

आरबीआयने नव्या वर्षाच्या सुट्ट्यांचं कॅलेंडर जाहीर केलं आहे
Bank Holidays In 2023
Bank Holidays In 2023esakal

Bank Holidays: नवं वर्ष सुरू होण्यास अगदी काहीच दिवस उरलेत. नव्या वर्षाच्या सुरूवातीला बऱ्याच सुट्ट्या असणार आहेत. तेव्हा तुम्ही जुन्या वर्षाचे काम नव्या वर्षावर ढकलण्याच्या विचारात असाल तर हा विचार तुमच्या डोक्यातून आजच काढून टाका. कारण नव्या वर्षाच्या सुरुवातीला बऱ्याच दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. आरबीआयने नव्या वर्षाच्या सुट्ट्यांचं कॅलेंडर जाहीर केलं आहे.

या रिपोर्टच्या माध्यमातून आज तुम्हाला 2023 मध्ये असणाऱ्या सुट्ट्यांबाबत सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही आताची काही कामे पुढल्या वर्षावर टाळत असाल तर तुम्हाला सुट्ट्यांबाबत योग्य ती माहिती असावी.

जानेवारी 2023 मध्ये बँकांना असणाऱ्या सुट्ट्यांची लिस्ट

  • 1 जानेवारी 2023 - रविवार - नवीन वर्षाच्या निमित्ताने देशभरात बँका बंद राहतील.

  • 2 जानेवारी 2023 - सोमवार - मिझोराममध्ये नवीन वर्षाच्या सुट्टीत बँका बंद राहतील.

  • 11 जानेवारी 2023 - बुधवार - मिझोराममध्ये मिशनरी डेला बँका बंद राहतील.

  • 12 जानेवारी 2023 - गुरुवार - स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील.

  • 16 जानेवारी 2023 - सोमवार - आंध्र प्रदेशातील उझावर थिरुनाली आणि कनुमा पांडुगा येथे पॉंडिचेरी आणि तामिळनाडूमध्ये बँक सुट्टी.

  • 23 जानेवारी 2023 - सोमवार - नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त आसाममध्ये बँका बंद राहतील.

  • 25 जानेवारी, 2023 - बुधवार - हिमाचल प्रदेशमध्ये राज्य स्थापना दिनानिमित्त बँकांना सुट्टी असेल.

  • 26 जानेवारी 2023 - गुरुवार - प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात बँका बंद राहतील.

  • 31 जानेवारी 2023 - मंगळवार - मी-दम-मी-फीमुळे आसाममध्ये बँका बंद राहतील.

या दिवशी बँकांना वीकेंडची सुट्टी असेल

नवीन वर्ष आणि रविवार 1 जानेवारीला बँकेला सुट्टी असणार आहे. याशिवाय 8, 15, 22 आणि 29 जानेवारीला रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत. त्याचवेळी 14 आणि 28 जानेवारीला चौथा शनिवार असल्याने बँकांना सुटी असणार आहे.

Bank Holidays In 2023
असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

ऑनलाइन सेवा सुरू राहतील

बँकेच्या सुट्ट्यांमध्ये ऑनलाइन सेवा सुरू राहतील. याशिवाय तुम्ही ऑनलाइन व्यवहारही सहज करू शकाल. त्याच वेळी, एटीएमद्वारे उपलब्ध असलेल्या सर्व सेवा सामान्य राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com