बॅंक ऑफ इंडियाची "एचडीआयएल'विरोधात दिवाळखोरीची याचिका

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 August 2019

मुंबईतील नामांकित विकासक असलेल्या हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर (एचडीआयएल) विरोधात बॅंक ऑफ इंडियाने कर्ज वसुलीसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे.

मुंबई: मुंबईतील नामांकित विकासक असलेल्या हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर (एचडीआयएल) विरोधात बॅंक ऑफ इंडियाने कर्ज वसुलीसाठी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे.

"एनसीएलटी'च्या मुंबई खंडपीठाने मंगळवारी (ता.20) "एचडीआयएल' विरोधातील दिवाळखोरीची याचिका दाखल करून घेतली. बॅंक ऑफ इंडियाची 522 कोटींची देणी "एचडीआयएल'कडे थकली आहेत. 
वांद्रे येथे "एचडीआयएल'चे भव्य कार्यालय आहे. यापूर्वीही कॉर्पोरेशन बॅंक, सिंडिकेट बॅंक, देना बॅंक आणि इंडियन बॅंक या बॅंकांनी एचडीआयएलकडील कर्ज थकबाकीसाठी लवादाकडे धाव घेतली आहे. 30जून अखेर एचडीआयएलच्या नफ्यात 67 टक्के घट झाली होती. कंपनीला 8.24 कोटींचा नफा झाला होता. गेल्या वर्षी "एचडीआयएल"ने जम्मू आणि कश्‍मिर बॅंकेला 334 कोटींची थकबाकी देऊन दिवाळखोरीचा खटला निकाली काढला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank of India's bankruptcy petition against HDIL