
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ महाराष्ट्रने "रेपो लिंक्ड' कर्ज व्याजदरामध्ये (आरएलएलआर) मध्ये 0.40 टक्क्याची कपात केली आहे. आता बॅंकेचा आरएलएलआर कमी होत तो आता 7.05 टक्क्यांवर आला आहे.
पुणे - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ महाराष्ट्रने (बीओएम) "रेपो लिंक्ड' कर्ज व्याजदरामध्ये (आरएलएलआर) मध्ये 0.40 टक्क्याची कपात केली आहे. आता बॅंकेचा आरएलएलआर कमी होत तो आता 7.05 टक्क्यांवर आला आहे. नवीन दर 8 जून 2020 पासून लागू करण्यात येणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
तसेच बॅंकेने सलग तिसऱ्या महिन्यात "मार्जिनल कॉस्ट लिंक' आधारित (एमसीएलआर) व्याजदरात 0.20 टक्क्याची कपात केली आहे. आता बॅंकेचा ओव्हरनाईट, एक महिन्याचा (एमसीएलआर) अनुक्रमे 7.20 टक्के (आधी 7.40 टक्के) आणि 7.30 टक्क्यांवर (पूर्वीचा 7.50 टक्के) येणार आहे. तीन महिने आणि सहा महिन्यांचा एमसीएलआर अनुक्रमे 7.40 टक्के आणि 7.50 टक्के होईल. एक वर्षासाठी एमसीएलआर 7.70 टक्के असेल.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा