
सरलेल्या तिमाहीत बॅंकेला १०१ कोटींचा निव्वळ नफा झाला. कार्यान्वयन नफा गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ७.९१ टक्के व गेल्या तिमाहीच्या तुलनेत १९.३३ टक्क्यांनी वाढून ७१० कोटी रूपयांचा झाला.
पुणे - बॅंक ऑफ महाराष्ट्रला चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १०१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत त्यात २४.७२ टक्के वाढ झाली आहे.
बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव, कार्यकारी संचालक हेमंत टम्टा आणि नागेश्वर राव; तसेच सरव्यवस्थापक संजय रूद्र यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्यात आले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सरलेल्या तिमाहीत बॅंकेला १०१ कोटींचा निव्वळ नफा झाला. कार्यान्वयन नफा गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत ७.९१ टक्के व गेल्या तिमाहीच्या तुलनेत १९.३३ टक्क्यांनी वाढून ७१० कोटी रूपयांचा झाला. कर्जावरील उत्पन्नात ०.६७ टक्के वाढ नोंदविली गेली. तसेच, व्याजाचे निव्वळ उत्पन्न ९.१४ टक्के वाढून १०८७.९२ कोटी रूपये झाले. बॅंकेचा एकूण व्यवसाय ७.६० टक्क्यांनी वाढून २,४९,६०८ कोटी रूपये झाला. एकूण ठेवींमध्ये १०.११ टक्क्यांची वाढ झाली. एकूण कर्जवितरण ३.८६ टक्क्यांनी वाढून ९६,६२१ कोटींवर पोचले. निव्वळ थकित कर्जे गतवर्षीच्या ५.९८ टक्क्यांच्या तुलनेत यंदा ४.१० टक्क्यांवर आली आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
बॅंकेने पहिल्या तिमाहीत कोविड-१९ नियंत्रणासाठी २७५ कोटींच्या पॅकेज तरतूद केली. बॅंकेच्या २४ टक्के ग्राहकांनी मुदत कर्जांच्या स्थगितीचा (मोरॅटोरियम) लाभ घेतला. या तिमाहीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी कोविड-१९ संबंधित २५०० कोटींची कर्जे मंजूर करण्यात आली. नव्या २०० शाखा उघडल्या जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.