'बँक ऑफ महाराष्ट्र'कडून कर्जदरात कपात 

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

'बँक ऑफ महाराष्ट्र'ने कर्जदरात कपात केली आहे.

पुणे: पुण्यात मुख्यालय असलेल्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील आघडीची बँक असलेल्या 'बँक ऑफ महाराष्ट्र'ने कर्जदरात कपात केली आहे. एसबीआयपाठोपाठ आता महाराष्ट्र बँकेकडूनही दर कपात करण्यात आली आहे. सध्याचा वार्षिक भांडवली खर्चावरील आधारित कर्जदार (एमसीएलआर) आता 10 बेसिस पॉईंट्सने कमी करण्यात आला आहे. 

बँक ऑफ महाराष्ट्रने एक महिना ते एक वर्ष कालावधीसाठी एमसीएलआर आता 0.10 टक्क्याने कमी केला आहे. एका महिना ते तीन महिने मुदतीसाठी 8.40 टक्क्यांवरून कमी करून 8.30 टक्के, तर तीन महिने ते सहा महिन्यांसाठी एमसीएलआर दर 8.50 टक्क्यांवरून कमी करत 8.40 टक्के करण्यात आला आहे. तर सहा महिन्यांपासून अधिक कालावधीसाठी 8.50 टक्के निश्चित करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank of Maharashtra reduces Lending Rates