विलीनीकरणाविरोधात बँकांचा बंद

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 September 2019

कर्मचाऱ्यांच्या मागण्या
रोखीच्या व्यवहारांची वेळ कमी करावी
पाच दिवसांचा आठवडा
ग्राहकांच्या सेवाकरामध्ये कपात करावी
रोजगारात वाढ करावी

मुंबई - केंद्र सरकारच्या बॅंकांच्या विलीनीकरणाला बॅंक कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपावर जाण्याचा इशारा बॅंक कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स कंफेडरेशन, ऑल इंडिया बॅंक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बॅंक ऑफिसर्स काँग्रेस आणि नेशन ऑर्गनायजेशन ऑफ बॅंक ऑफिस या बॅंक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी विलीनीकरणाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बॅंकांच्या विलीनीकरणामुळे अनेक कर्माचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. त्यामुळे या संघटनांनी संपाची हाक दिली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात २६ ते २७ अशा दोन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे.

त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी चौथ्या शनिवारची सुटी असणार आहे. तर, २९ सप्टेंबरला रविवारची सुटी असणार आहे. त्यामुळे सलग चार दिवस बॅंका बंद राहणार आहेत. परिणामी, ग्राहकांना आठवड्याच्या सुरवातीलाच बॅंकांची कामे उरकून घ्यावी लागणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank Merger Conflict Employee Ban Strike