बँक ऑफ बडोदाचे गृहकर्जव्याज मर्यादित काळासाठी ६.५० टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Home Loan

बँक ऑफ बडोदाचे गृहकर्जव्याज मर्यादित काळासाठी ६.५० टक्के

मुंबई - बँक ऑफ बडोदाने आपल्या गृहकर्जावरील व्याजदर मर्यादित काळासाठी साडेसहा टक्के एवढे घटविले आहेत. त्याचबरोबर त्यावरील प्रक्रिया शुल्कही (प्रोसेसिंग फी) रद्द केली आहे. हा सवलतीचा व्याजदर यावर्षी ३० जून पर्यंत लागू राहील. नव्याने कर्ज काढणाऱ्यांसाठी किंवा इतर वित्तसंस्थांकडील आपले गृहकर्ज बँक ऑफ बडोदामध्ये नेणाऱ्यांना हा दर लागू राहील. कर्जाची रक्कम कितीही असली तरी हे नवे दर लागू होतील. सध्या त्यांचे गृहकर्जावरील व्याजदर ६.७५ टक्के एवढे आहे. मात्र दर घटवल्याने त्यांचे दर इतर कमी व्याजदर असलेल्या बँकांच्या आसपास आले आहेत. मात्र ते कर्ज घेणाऱ्याच्या क्रेडिट रेटिंगवर अवलंबून असतील, असे बँकेचे महाव्यवस्थापक एच. टी. सोळंकी यांनी सांगितले. कर्जासाठी बँकेच्या शाखांमध्ये किंवा https://www.bankofbaroda.in/ या वेबसाईटला भेट द्यावी

Web Title: Bank Of Barodas Home Loan Interest Rate Limited 650 Percent

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top