पाचशेच्या बनावट नोटांपासून सावधान!

पाचशेच्या बनावट नोटांपासून सावधान!

मुंबई: नोटबंदीनंतर पुन्हा एकदा बनावट पाचशेच्या नोटांनी डोकेवर काढले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील बनावट चलनाचे प्रमाण पुन्हा एकदा वाढ असल्याचे बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी नोटांची छाननी करताना आपल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत, असे वृत्त द हिंदू बिझनेस लाइनने दिले आहे. 

दिलेल्या वृत्तानुसार, बनावट चलनांमध्ये मुख्यतः पाचशे रुपये मूल्याच्या नोटेचे प्रमाण वाढले आहे. यामुळे बँक अधिकारी आणि सामान्य लोकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बनावट नोटा आढळणे नवीन नसले तरी त्याचे वाढते प्रमाण मात्र चिंताजनक असल्याचे बँकेच्या एका वरिष्ठ शाखा-अधिका-याने सांगितले.

वाढत्या बनावट नोटांबाबत सांगताना एका बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'चलनात असलेल्या बनावट पाचशेच्या नोटेवर रिझर्व्ह बँकेचे 'Resurve Bank of India’ असे शब्दलेखन दिसून आले आहे. बँक कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले असून आता एटीएममध्ये टाकण्यात येणाऱ्या नोटांबाबत देखील याची खबरदारी घेण्यात सांगण्यात आले आहे. 

खोटी नोट मिळाल्यास काय कराल? 
बँकेच्या काउंटरवरून नोटा घेण्यापूर्वी त्यात खोटी नोट नाही ना हे तिथेच तपासून पाहा. आढळल्यास या  नोटेवर 'काउंटरफिट नोट' असा शिक्का बँकेने मारणे बंधनकारक आहे. त्यानंतर या नोटेचा क्रमांक बँकेच्या सर्व शाखांना कळवला जातो 


अशी तपासा नोट 
महात्मा गांधी मालिकेतील नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र वॉटरमार्कच्या स्वरूपात दिसते. शिवाय नोटेमध्ये सुरक्षा धागा असतो. यावर पृष्ठभागावर हिंदीमध्ये 'भारत' असे तर पार्श्वभागावर 'आरबीआय' असे लिहिलेले आहे. नोट डोळ्यांच्या पातळीत जमिनीला समांतर धरल्यास नोटेच्या पार्श्वभागी महात्मा गांधींच्या उजव्या बाजूला त्या नोटेचे मूल्य सांगणारे चित्र अस्पष्ट दिसते. नोटेचा खरेपणा लक्षात यावा यासाठी गव्हर्नरांची स्वाक्षरी छापताना ती सहज स्पर्शून जाईल अशी छापलेली आहे. त्याचप्रमाणे डावीकडे उन्नत स्वरूपात अशोकस्तंभही छापलेला असतो. प्रत्येक नोटेवर मूल्यानुसार ओळखचिन्ह असते. आयत, त्रिकोण, गोल अशा विविध आकारात हे चिन्ह नोटेवर ठळकपणे छापलेले असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com