Bank Strike : 'या' दिवशी बँक कर्मचारी संपावर! बँकिंग-एटीएम सेवांवर होणार परिणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bank strike

Bank Strike : 'या' दिवशी बँक कर्मचारी संपावर! बँकिंग-एटीएम सेवांवर होणार परिणाम

पुढील आठवड्यात बँक कर्मचारी संपावर जाणार असल्याने बँकिंग सेवेवर परिणाम होऊ शकतो. 19 नोव्हेंबर 2022 रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने दोन दिवसीय संप पुकारला आहे.

बँक ऑफ बडोदाने स्टॉक एक्सचेंजमध्ये नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) चे सरचिटणीस यांनी इंडियन बँक असोसिएशनला संपावर जाण्याची नोटीस जारी केली आहे. या नोटीसमध्ये युनियनने आपल्या मागण्यांसाठी 19 नोव्हेंबर 2022 रोजी संपावर जाण्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

संपाच्या दिवशी बँक शाखा आणि कार्यालये सुरू ठेवण्यासाठी योग्य पावले उचलली जात असल्याचे बँकेने म्हटले आहे. बँक कर्मचारी संपावर गेल्यास बँकेच्या शाखा आणि कार्यालयांच्या कामावर परिणाम होऊ शकतो, असे बँकेने म्हटले आहे. 19 नोव्हेंबर 2022 रोजी शनिवारी येत आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या चौथ्या शनिवारी बँक बंद असते. मात्र या महिन्याच्या तिसऱ्या शनिवारीही संपामुळे बँकिंग सेवा बंद राहू शकतो.

शनिवारी बँकांचा संप असेल आणि दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने सुट्टी आहे. अशा स्थितीत सर्वसामान्यांना बँकेच्या एटीएममध्ये दोन दिवस पैसे नसतील त्यामुळे पैशांच्या टंचाई निर्माण होऊ शकते.

हेही वाचा: RBI ने गेल्या 3 वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली नाही; वाचा काय आहे कारण

बँक कर्मचारी आपल्या अनेक मागण्यांसाठी संपावर जात आहेत. बँक युनियनमधील सक्रिय कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. बँक जाणीवपूर्वक युनियनशी संबंधित कर्मचाऱ्यांना टार्गेट केले जात असल्याचे बँक युनियनचे म्हणणे आहे. बँक युनियन्सशी संबंधित कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जात आहे.