esakal | आत्ताच करुन घ्या बँकेची कामे; मार्च महिन्यात तब्बल 12 दिवस बंद असतील बँका
sakal

बोलून बातमी शोधा

Banks

अनेक सरकारी तसेच खासगी बँका पुढील आठवड्यात फक्त चार दिवसांसाठीच उघड्या राहणार आहेत.

आत्ताच करुन घ्या बँकेची कामे; मार्च महिन्यात तब्बल 12 दिवस बंद असतील बँका

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पुढील आठवड्यात तुमच्या अनेक आर्थिक कामांना ब्रेक लागू शकतो. कारण हे की पुढील आठवड्यात अनेक कारणांमुळे बँकेला सुट्ट्या असणार आहेत. अनेक सरकारी तसेच खासगी बँका पुढील आठवड्यात फक्त चार दिवसांसाठीच उघड्या राहणार आहेत. बँकेचा संप आणि सार्वजनिक सुट्ट्यांमुळे बँका कमी काळासाठी उघड्या राहणार आहेत, त्यामुळे आपल्या आर्थिक कामांचं नियोजन त्यानुसारच ग्राहकांनी करायला हवे. मात्र, मोबाईल तसेच इंटरनेट बँकींगमध्ये यादरम्यान कसलाही अडथळा येणार नाहीये. सरकारने जाहीर केलेल्या बँकेच्या एकत्रिकरणाविरोधात अनेक देशव्यापी बँक युनियन्सनी 15 आणि 16 मार्च रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. यामध्ये All India Bank Employees' Association (AIBEA), All India Bank Officers' Confederation (AIBOC), NCBE, AIBOA, BEFI, INBEF, IBOC, NOBW, NOBO आणि AINBOF अशा बँकेच्या संघटना समाविष्ट आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात 13 मार्च ते 16 मार्च दरम्यान बँका सलग चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - शेतकरी आंदोलनावर ब्रिटनच्या संसदेत चर्चा; भारताने व्यक्त केली नाराजी

  • 13 मार्च 2021 : दुसरा शनिवार
  • 14 मार्च 2021 : रविवार
  • 15 मार्च 2021 : सोमवारी बँकेचा संप
  • 16 मार्च 2021 : मंगळवारी बँकेचा संप
  • 21 मार्च 2021 : रविवार

यावर्षीच्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इन्श्यूरन्स कंपनीसह PSB अर्थात दोन पब्लिक सेक्टर बँकेचे खासगीकरण करण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने 10 पब्लिक सेक्टर बँकेचे एकत्रिकरण करुन चार बँका केल्या होत्या. त्यामुळे, एकूण PSB ची संख्या 27 वरुन 12 वर आली होती. 

मार्च 2021 मधील सुट्ट्यांची यादी

मार्च 11, 2021: महाशिवरात्री

मार्च 13, 2021: दुसरा शनिवार

मार्च 14, 2021: रविवार

मार्च 21, 2021: रविवार

मार्च 22, 2021: बिहार दिवस

मार्च 27, 2021: चौथा शनिवार

मार्च 28, 2021: रविवार

मार्च 29, 2021: धुलेती

मार्च 30, 2021: होळी

loading image
go to top