
Home Loan : घर खरेदी करायचंय ? कुठे मिळवाल कमीत कमी व्याजदरात गृहकर्ज ?
Home Loan Interest Rate: तुम्हीही स्वतःचे घर घेण्याचा विचार करत आहात का ? महागाईत कर्ज न घेता स्वतःचे घर घेणे प्रत्येकाच्या कुवतीत नसते. आज आम्ही तुम्हाला अशा काही बँकांबद्दल सांगणार आहोत ज्या कमी व्याजदरात गृहकर्ज देतात.
आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी कर्जाचे व्याजदरही वाढवले आहेत. असे असूनही, जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आपण अशा काही बँका बघू या ज्या तुम्हाला सर्वांत कमी व्याजदरात कर्ज देतात. (banks which charge low interest rate on home loans) हेही वाचा - सोन्याची झळाळी आगामी काळात आणखी वाढणार ?
बँक ऑफ महाराष्ट्र
ही अशी बँक आहे जी तुम्हाला अतिशय स्वस्तात कर्ज देते. तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्ज घेतल्यास तुम्हाला फक्त ६.८ टक्के व्याजदर भरावा लागेल आणि कमाल व्याजदर ८.२ टक्के आहे.
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ इंडिया देखील आपल्या ग्राहकांना अत्यंत कमी दरात कर्ज देते. ही बँक ग्राहकांना किमान ६.९ टक्के व्याजदराने गृहकर्ज देते.
पंजाब अॅण्ड सिंध बँक
पंजाब आणि सिंध बँकही आपल्या ग्राहकांना अत्यंत कमी दरात कर्ज देत आहे. ही बँक ग्राहकांना किमान ६.९ टक्के व्याजदराने गृहकर्ज देते. त्याच वेळी, बँकेने ८.६ टक्के कमाल व्याजदर ठेवला आहे.
गृहकर्ज घेण्यासाठी तुम्ही सलग ३ वर्षे प्राप्तिकर परतावा (Income Tax Return) दाखल केलेला असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला फॉर्म १६ सादर करावा लागेल.
गृहकर्ज देताना बँका तुमचा सिबिल स्कोरही बघतात. तुमच्या प्रत्यक्ष प्राप्त उत्पन्नाच्या (in hand salary) ६५ ते ७५ पट कर्ज तुम्हाला मिळू शकते.