Save Money : छोट्याशा पगारात अशी करा मोठी बचत; कधीच भासणार नाही पैशांची कमतरता

इतर बिलांसाठी जसे तुम्ही पैसे बाजूला काढता तसे सेव्हिंग्जसाठीसुद्धा पैसे बाजूला काढा.
Save Money
Save Moneygoogle

मुंबई : कमी उत्पन्न असलेले लोक बचत करण्यासाठी सतत धडपड असतात; कारण त्यांच्याकडे खर्चानंतर पुरेसे पैसे शिल्लक राहात नाहीत किंवा त्यांना बचत करण्याची सवय नसते. प्रत्येकजण कितीही कमावत असला तरीही शिस्त आणि आर्थिक नियोजनाने बचत करता येते.

एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने एकदा म्हटल्याप्रमाणे, 'बचत तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अटींवर जीवन जगण्याचे स्वातंत्र्य देते.' म्हणून स्वत:ला शिस्त लावा, चांगले नियोजन करा आणि आपल्या स्वातंत्र्याचा मान राखा." आता कमी उत्पन्नात बचत कशी करायची ते पाहा. हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते ?

Save Money
Government Job : या सरकारी बँकेत भरती; शिक्षण पूर्ण होताच लगेच मिळणार नोकरी

टीप १ : बजेट तयार करा आणि त्यावर ठाम राहा

तुम्ही महिन्याचं बजेट तयार करताना स्वत:च्या इच्छा-आकांक्षा मारत आहात असं तुम्हाला वाटू शकतं; पण तसं होत नाही. छंद आणि गरजांपर्यंत एका मर्यादेपर्यंत खर्च करता येतो. अनावश्यक खर्च आवर्जून टाळा.

दर महिन्याचे नियमित खर्च लिहून ठेवा आणि तेवढेच करा. नव्याने काही खर्च केल्यास तेही लिहा. म्हणजे तुमचे पैसे कुठे खर्च होतात हे तुम्हाला समजू शकेल.

टीप २ : बचत करण्याची सवय लावा

इतर बिलांसाठी जसे तुम्ही पैसे बाजूला काढता तसे सेव्हिंग्जसाठीसुद्धा पैसे बाजूला काढा. सुरुवातीला कमी रक्कम बाजूला काढा आणि हळूहळू ती वाढवत न्या. गॅरंटीड सेव्हिंग्ज प्लॅनमध्ये गुंतवणूक करू शकता.

तुमच्या वृद्ध वडिलांचे किंवा मुलांचे आरोग्य यांसारख्या अत्यावश्यक गरजांचा अंदाज घ्या आणि संभाव्य परिस्थितीचा आराखडा तयार करा. त्यानुसार रक्कम बाजूला काढा.

बचतीला तुमची सवय बनवा. लोक कदाचित तुम्हाला कंजूस म्हणतील. पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. गरज असेल तेव्हा तुम्हाला कोणाकडून उधार घ्यावी लागणार नाही.

टीप ३ : तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विम्याचा लाभ घ्या

जीवन विमा आणि बचत योजना यांसारख्या योजनांमध्ये पैसे गुंतवल्याने तुम्हाला सुरक्षितता आणि प्रभावी बचत साधन मिळते. याचा चांगला वापर केल्यास, तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे आणि भविष्यातील खर्च जसे की नवीन घर, लग्न, मुलांचे शिक्षण किंवा सेवानिवृत्ती यांसाठी संपत्ती निर्माण करू शकता.

Save Money
Long Distance Relationship : तुम्ही देशात, जोडीदार परदेशात; शरीरसुख कसे मिळवाल ?

टीप ४ : घरखर्चात कपात करा

CNBC1 च्या संशोधनानुसार, घरखर्च हा एकूण मासिक उत्पन्नाच्या ३०% पेक्षा जास्त नसावा. जर तुम्ही दरमहा रु.३०,००० कमवत असाल तर घरखर्च ९ हजारपेक्षा जास्त असू नये. तुमचे घर मोठे असेल तर ते भाड्याने देऊन तुम्ही सर्व गरजा भागतील अशा छोट्या घरात राहू शकता. घरभाड्यामुळे तुमच्या बचतीला हातभार लागेल.

टीप ५ : फूड बजेटसुद्धा ठरवा

UN च्या जागतिक अन्न कार्यक्रम (WFP) द्वारे जारी केलेल्या "कॉस्ट ऑफ ए प्लेट ऑफ फूड" अहवालानुसार, सरासरी, एक भारतीय त्यांच्या दैनंदिन उत्पन्नाच्या ३.५% एक प्लेट फूडसाठी खर्च करतो. तसेच न्यू यॉर्कमधील प्रत्येक रहिवासी ०.६% खर्च करतो.

त्यामुळे सतत बाहेरचे खाणे टाळा. जास्तीत जास्त घरचे अन्न खा. यामुळेही पैशांची बचत होईल.

टीप ६ : बचत तयार करण्यासाठी अनावश्यक खर्च कमी करा

तुम्हाला पैसे वाचवणे कठीण वाटत असल्यास, अनावश्यक खर्च कमी करण्याची वेळ आली आहे. तुमच्या बजेटचे निरीक्षण करा आणि टाळता येणारे खर्च शोधा.

उदा. - सबस्क्रीप्शन्स रद्द केले जाऊ शकतात. महागडे फोन टाळता येतील, मनोरंजनासाठी अनावश्यक खर्च टाळता येईल.

तुमच्या बचतीला चालना देण्यासाठी अनावश्यक खर्च कमी करणे सुरुवातीला त्रासदायक वाटू शकते; परंतु सरावाने सोपे होईल.

जर तुम्ही तुमची बचत वाढवण्यास आणि आर्थिक-स्वतंत्र जीवन जगण्यास उत्सुक असाल, तर थोडा वेळ घ्या आणि तुमची सध्याची आर्थिक परिस्थिती आणि ध्येयांशी प्रामाणिक रहा. आता, वरील टिप्स तुमच्या आयुष्यात एक एक करून अवलंबण्याचा प्रयत्न करा.

सुरुवातीला हे कठीण वाटू शकते, परंतु तुमच्या जीवनशैलीत आणि मानसिकतेत काही बदल करून तुम्ही आर्थिकदृष्ट्या परिपूर्ण जीवनासाठी तयार व्हाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com