बँकेतील कामे उरकून घ्या; कारण या आठवड्यात बँका राहणार सलग तीन दिवस बंद

टीम ई-सकाळ
Tuesday, 22 December 2020

यंदाचे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे लवकरच नवीन वर्ष सुरु होणार आहे. मात्र वर्ष संपण्यापूर्वी बँकेच्या संबंधित आपले काही काम असल्यास ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे.

यंदाचे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे लवकरच नवीन वर्ष सुरु होणार आहे. मात्र वर्ष संपण्यापूर्वी बँकेच्या संबंधित आपले काही काम असल्यास ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. कारण वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आणि शेवटच्या आठवड्यात बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. तर रिजर्व्ह बँकेच्या (आरबीआय) वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये डिसेंबर महिन्यातील शेवटच्या 9 दिवसांपैकी 5 दिवस बँका बंद राहणार आहेत. 

तुम्ही थेट SBI कडूनच खेरेदी करु शकता स्वस्तात मस्त घर; जाणून घ्या संपूर्ण माहिती

या महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात बँका तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेत आपले काही काम असल्यास ते गुरुवार 24 तारखेपर्यंत पूर्ण करू शकता. मात्र त्यानंतर बँकेतील कामासाठी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. कारण ख्रिसमसमुळे 25 तारखेला बँक बंद असेल. त्यानंतर महिन्यातील चौथ्या शनिवारमुळे बँक 27 तारखेला देखील बंद राहतील. आणि त्यानंतर 28 तारखेला रविवारची साप्ताहिक सुट्टीमुळे बँकेला लागोपाठ तीन दिवस टाळे असणार आहे. त्याशिवाय, इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर पर्यंत आहे. त्यामुळे रिटर्न भरण्यासंबंधीचे काही काम बँकेत असेल तर, ते या गुरुवार पर्यंत तुम्ही पूर्ण करू शकता. पण त्यानंतर तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे.    

गुंतवणुकीला देऊया ‘गोल्डन टच’ 

याव्यतिरिक्त, देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका सलग 9 दिवस बंद राहणार असल्याची माहिती आरबीआयच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. शिलॉंग आणि मिझोरमची राजधानी ऐझॉल मध्ये 24 डिसेंबर 2020 रोजी ख्रिसमस इव्हच्या निमित्ताने बँक बंद राहणार आहेत. त्यानंतर 25 तारखेला ख्रिसमससाठी बँक बंद असेल. तर 26 डिसेंबर रोजी शिलाँग प्रांतात बँक बंद राहतील. 27 डिसेंबरला रविवारची सुट्टी असेल. याशिवाय यू किआंग नंगबाहमुळे 30 डिसेंबर रोजी शिलाँग राज्यातील बँका बंद राहणार आहेत. आणि 31 डिसेंबर रोजी न्यू इअर नाईटमुळे ऐझॉल मधील बँक बंद असणार आहेत.         


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banks will be closed for three days in a row 

Tags
टॉपिकस