
माणसाच्या आयुष्यातील तीन मूलभूत गोष्टी म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. त्यामुळे सर्वांनाच कधी ना कधी आपले स्वतःचे घर असावे अशी इच्छा असते.
माणसाच्या आयुष्यातील तीन मूलभूत गोष्टी म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. त्यामुळे सर्वांनाच कधी ना कधी आपले स्वतःचे घर असावे अशी इच्छा असते. आणि त्यासाठीच तो दररोजच्या धकाधकीच्या जीवनात धडपडत असतो. त्यातच मोठ मोठ्या शहरांमध्ये घराच्या किमती आकाशाला भिडल्या असल्यामुळे प्रत्येकाचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. मात्र जर आपणाला देखील स्वतःचे घर स्वस्तात घ्यायचे असेल ते सत्यात उतरू शकते. कारण बाजारपेठेपेक्षा कमी किंमतीत घर, दुकान किंवा औद्योगिक मालमत्ता खरेदी करायची असेल तर देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) तुम्हाला संधी देत आहे. व ही संधी यावर्षीच्या अखेरपर्यंतच असणार आहे. त्यामुळे एसबीआयच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन तुम्ही देखील हवी असलेली मालमत्ता खरेदी करू शकता.
Gold Price Update : खुशखबर! लग्नसराईत सोन्याच्या किंमतीत आणखी घट
एसबीआय ही काही कारणास्तव कर्ज परतफेड करू न शकलेल्या ग्राहकांच्या संपत्तीचा लिलाव करणार आहे. आणि या लिलावात निवासी घरांपासून, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या मालमत्तांचा समावेश असणार आहे. एसबीआयच्या ग्राहकांनी घेतलेले कर्ज काही कारणामुळे परतफेड केलेले नसल्यामुळे अशी संपत्ती बँकेने आपल्या ताब्यात घेतलेली आहे. आणि या संपत्तीची विक्री बँक ई-लिलावाद्वारे करणार आहे. घेतलेले कर्ज न फेडलेल्या ग्राहकांची ही मालमत्ता बँकेकडे तारण आहे. आणि या संपत्तीची विक्री करून बँक आपले अडकलेले पैसे परत मिळवणार आहे.
देशातील एसबीआय बँकेने या लिलावाची माहिती सोशल मीडियाच्या ट्विटर वरून दिलेली आहे. बॅंकेने ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार, ई-लिलाव योजनेंतर्गत लिलावात भाग घेण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. तसेच या लिलावातून देशाच्या कोणत्याही ठिकाणी मालमत्ता खरेदी करता येणार आहे. तसेच या लिलावात इच्छुक खरेदीदारास मालमत्तेविषयी संपूर्ण माहिती देण्यात येणार असल्याचे बँकेने नमूद केले आहे. याव्यतिरिक्त लिलावात भाग घेण्यापूर्वी संबंधित इच्छुक खरेदीदारास मालमत्तेचे आकार, स्थान व इतर माहिती बॅंकेकडून मिळवता येणार आहे.
LPG सिलिंडर स्वतः घरी नेल्यास गॅस एजन्सी देते पैसे, जाणून घ्या नियम
एसबीआय येत्या 6 दिवसांत 758 निवासी, 251 व्यावसायिक आणि 98 औद्योगिक मालमत्तांचा लिलाव करणार आहे. तर पुढील 30 दिवसांत 3032 निवासी, 844 व्यावसायिक आणि 410 औद्योगिक मालमत्तांचा लिलाव करणार असल्याचे बँकेने सांगितले आहे. त्यामुळे तुम्हाला देखील या लिलावात सहभागी व्हायचे असल्यास बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरून नोंदणी करावी लागणार आहे. तसेच जवळच्या बँक शाखेत केवायसी डॉक्युमेंट्स सादर करावे लागणार आहे.
Looking for properties to invest? ! Register for SBI Mega E-Auction: https://t.co/ndlGZhxWVw#SBI #StateBankOfIndia #Auction #Properties pic.twitter.com/QC6kvqoxbg
— State Bank of India (@TheOfficialSBI) December 19, 2020