Share Market : गुंतवणूकदारांची चांदी! फक्त 6 महिन्यात 'या' शेअरने 1 लाखाचे केले 45 लाख... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

Share Market : गुंतवणूकदारांची चांदी! फक्त 6 महिन्यात 'या' शेअरने 1 लाखाचे केले 45 लाख...

शेअर बाजारात असे अनेक स्टॉक्स आहे, जे शेअर बाजारात घसरण असो वा वाढ, कायम मल्टीबॅगर परतावा देत असतात. असाच एक शेअर बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनचा (Baroda Rayon Corporation) आहे. या शेअरने गेल्या 6 महिन्यांत 4291% परतावा दिला आहे.

शुक्रवारी बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये लोअर सर्किट लागले. कंपनीचे शेअर 4.99% घसरून 345.60 रुपयांवर बंद झाले. कंपनीचे शेअर्स यावर्षी 1 जूनला बीएसईवर लिस्ट झाले होते. तेव्हा त्याची किंमत फक्त 4.64 रुपये होती. अशाप्रकारे, गेल्या 6 महिन्यांत बडोदा रेयॉन कॉर्पोरेशनच्या शेअरच्या किमतीत सुमारे 4,291 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 जून रोजी बडोदा रेयॉनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्यात 4,475.43 टक्के वाढ होऊन सुमारे 45.75 लाख रुपये झाले असते. म्हणजे अवघ्या 5 महिन्यांत त्याला सुमारे 45 लाख रुपयांचा नफा झाला असता.

गेल्या एका महिन्यात बडोदा रेयॉनच्या शेअरची किंमत 80.30 रुपयांवरून 212.30 रुपयांपर्यंत वाढली आहे. अशाप्रकारे, या शेअरने गेल्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 164.38 टक्के नफा दिला आहे. याचा अर्थ एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीच्या शेअर्समध्ये महिन्याभरासाठी 1 बडोदा रेयॉन कॉर्पोरेशन ही गुजरात-मुख्यालय असलेली टेक्सटाइल कंपनी आहे ज्याचे प्रमोटर संग्रामसिंह गायकवाड (पूर्वीच्या बडोदा राजघराण्याचे वारस) आहेत.

1958 मध्ये सुरू झालेली ही कंपनी बडोद्याचे माजी महाराज फतेसिंग राव गायकवाड यांनी ताब्यात घेतली होती. त्यांच्या निधनानंतर संग्रामसिंह गायकवाड आता या कंपनीची जबाबदारी पाहत आहेत आणि त्यांचा मुलगा प्रतापसिंह गायकवाड हा कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.

हेही वाचा: Share Market : बाजारात घसरण असूनही 'हा' शेअर देतोय धमाकेदार रिटर्न; वाचा काय आहे किंमत

कंपनी व्हिस्कोस फिलामेंट रेयॉन यार्न, सल्फ्यूरिक ऍसिड, कार्बन डाय-सल्फाइड, निर्जल सोडियम सल्फेट आणि नायलॉन सूत तयार करण्याच्या व्यवसायात आहे. कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप 486.41 कोटी रुपये आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.