
बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?
मुंबई : जुलै सिरीजच्या पहिल्या दिवशी अर्थात शुक्रवारी बाजारात विक्री दिसून आली. सेन्सेक्स, निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 111 अंकांनी घसरून 52 हजार 908 वर तर निफ्टी 28 अंकांनी घसरून 15 हजार 752 वर बंद झाला. मिडकॅप शेअर्समध्ये काहीशी वाढ दिसून आली.
हेही वाचा: कोणते शेअर्स तुम्हाला देतील तगडा परतावा?, काय सांगतायत एक्स्पर्ट्स
दुसरीकडे, विंडफॉल टॅक्सच्या बातम्यांमुळे एनर्जी शेअर्समध्ये बरीच घसरण दिसली. एनर्जी इंडेक्स जवळपास 4 टक्क्यांनी घसरला. सर्वात जास्त दबाव पीएसई, मेटल शेअर्सवर होता, त्यानंतर एफएमसीजी, रियल्टी, फार्मा शेअर्सवर सर्वाधिक दबाव दिसून आला. बँकिंग शेअर्समध्ये रिकव्हरी दिसली.
हेही वाचा: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
निफ्टीने आठवड्याची सुरुवात चांगली केली पण ती सलग राखण्यात अपयश आल्याचे BNP परिबासचे गौरव रत्नपारखी म्हणाले. मागच्या आठवडाभर बाजारात कंसोलिडेशन दिसून आले.
निफ्टीला 15,700-15,660 च्या जवळ सपोर्ट होता. मात्र, 1 जुलै रोजी निफ्टीने हा सपोर्ट तोडला. आता 15500 bj सपोर्ट दिसत आहे. येत्या ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टी 15,500-15,900 च्या रेंजमध्ये कंसोलिडेशन पाहू शकेल. जर निफ्टी 15,900-16,000 च्या झोनपर्यंत पोहोचला तर विक्रीचा दबाव दिसून येईल. दुसरीकडे, निफ्टी 15,600-15,500 च्या दिशेने घसरला, तर ही खरेदीची संधी असेल.
सध्या गुंतवणूकदार जगाच्या आर्थिक स्थितीबद्दल खूप चिंतेत आहेत आणि त्यामुळे कोणत्याही नकारात्मक बातम्यांवर विक्री होताना दिसत असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले यांनी सांगितले. ऑईल अँड गॅस आणि ऑटो शेअर्समध्ये विक्रीमुळे शुक्रवारी बाजार घसरणीसह बंद झाला. पण आयटी आणि रियल्टी शेअर्समधील खरेदीमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
आयटीसी (ITC)
बजाज फायनान्स (BAJAJFINANCE)
सिप्ला (CIPLA)
बीपीसीएल (BPCL)
ओएनजीसी (ONGC)
रिलायन्स (RELIANCE)
पॉवरग्रीड (POWERGRID)
बजाज ऑटो (BAJAJAUTO)
भारती एअरटेल (BHARTIARTL)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Before The Market Starts Find Out Which 10 Shares Will
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..