Share Marketing I कोणते शेअर्स तुम्हाला देतील तगडा परतावा?, काय सांगतायत एक्स्पर्ट्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेअर्स

कोणते शेअर्स तुम्हाला देतील तगडा परतावा?, काय सांगतायत एक्स्पर्ट्स

शेअर बाजारात दमदार शेअर्स खरेदी करणे एक मोठं आव्हान असते, पण असे दमदार शेअर्स तुम्ही तज्ज्ञांच्या मदतीने घेऊ शकता. आयआयएफएल सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन तुम्हाला याबाबत सल्ला देत असतात. आजही त्यांनी तुमच्यासाठी काही शेअर्स आणले आहेत, त्यावर एक नजर टाकुयात.

वेदांता (Vedanta), बॉश (Bosch), गुजरात गॅस (Gujarat Gas), एल अँड टी ( L&T) या सर्व शेअर्सने चांगली कामगिरी केल्याचे संजीव भसीन म्हणाले. या सगळ्या शेअर्सचा तुम्ही विचार करु शकता असेही ते म्हणाले. पण संजीव भसीन यांनी आणखी 2 शेअर्स सांगितले आहेत जे येत्या काळात चांगले परफॉर्म करतील.

हेही वाचा: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांंमध्ये धाकधूक कायम

संजीव भसीन यांनी सगळ्यात आधी जीएमआरबाबत (GMR) सांगितले, जिथे एरोसिटी (Aerocity) चांगली कामगिरी करत आहे. याशिवाय त्यांनी एल अँड टीचा (L&T) टॉप पिक मध्ये समावेश केला आहे. डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे येत्या काळात या शेअर्समध्ये तेजी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संजीव भसीन यांनी एचडीएफसी एएमसी जुलै फ्युचरचा (HDFC AMC July Future) विचार करायला सांगितले आहे. ही सर्वोत्तम कामगिरी करणारी एएमसी आहे, ज्यामध्ये खूप चांगला परतावा मिळू शकतो असेही तज्ज्ञ सांगत आहेत.

हेही वाचा: २५ पैशांचे नाणे बनवेल तुम्हाला लखपती

  • एचडीएफसी एएमसी जुलै फ्युचर (HDFC AMC July Future)

  • सीएमपी (CMP) - 1794.00 रुपये

  • टारगेट (Target) - 1830 - रुपये

  • स्टॉप लॉस (Stop Loss) - 1740 - रुपये

  • एल अँड टी टेक जुलै फ्युचर (L&T Tech July Future)

  • सीएमपी (CMP) - 3089.95 - रुपये

  • टारगेट (Target) - 3200 - रुपये

  • स्टॉप लॉस (Stop Loss) - रुपये

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

हेही वाचा: आजपासून सोनं खरेदी महागलं, आयात शुल्कात 5 टक्के वाढ

Web Title: Which Company Shares Give Best Return With The Advice Of Experts

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top