बिल गेट्सची जागा पटकावली 'या' उद्योगपतीने!

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

नवी दिल्ली : एलव्हीएमएच (LVMH) या लक्झरी वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे अध्यक्ष 'बर्नार्ड अरनॉल्ट' हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकले आहे. त्यामुळे आता बिल गेट्स जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर गेले आहे. 

नवी दिल्ली : एलव्हीएमएच (LVMH) या लक्झरी वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे अध्यक्ष 'बर्नार्ड अरनॉल्ट' हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकले आहे. त्यामुळे आता बिल गेट्स जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर गेले आहे. 

जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील सर्वोच्च स्थान अमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांनी टिकवले आहे. तर दुसऱ्या स्थानी बर्नार्ड अरनॉल्ट आणि तिसऱ्या स्थानी बिल गेट्स विराजमान आहेत. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सने ही यादी जाहीर केली आहे. या इंडेक्समध्ये सहभागी असलेल्या जगातील 500 श्रीमंत व्यक्तींची संपत्ती दररोज अद्ययावत केली जाते.

या यादीनुसार, बर्नार्ड अनरॉल्ट (वय 70) यांची संपत्ती 7.45 लाख कोटी रुपये इतकी झाली. एलव्हीएचएम कंपनीच्या शेअर्समध्ये 1.38 टक्क्यांची तेजी आल्याने त्यांची संपत्ती 108अब्ज डॉलर (7.45 लाख कोटी) इतकी झाली आहे. तर बिल गेट्स यांची संपत्ती 107 अज्ब डॉलर (7.38 लाख कोटी रुपये) इतकी झाली आहे.

बिल गेट्स हे सात वर्षांत पहिल्यांदाच तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. या इंडेक्सनुसार, या वर्षी बर्नार्ड यांच्या संपत्तीत सर्वाधिक 39 अब्ज डॉलरची (2.69लाख कोटी) वाढ झाली आहे. बर्नाल्ड यांची संपत्ती ही फ्रान्सच्या जीडीपीच्या 3 टक्क्यांइतकी आहे. गेल्या महिन्यांत बर्नार्ड हे सेंटीबिलेनिअर कँपमध्येही सामील झाले होते. यामध्ये जगातील केवळ तीनच व्यक्ती आहेत त्या म्हणजे जेफ बेजोस, बिल गेट्स आणि बर्नाल्ड अरनॉर्ल्ट.

बर्नार्ड यांच्याजवळ एलव्हीएमएच कंपनीचे सुमारे 50 टक्के शेअर्स आहेत तर फॅशन हाऊस ख्रिश्चिअन डायरचे सुमारे 97 टक्के शेअर्स आहेत. फ्रान्सच्या ऐतिहासिक नोट्रेडेम कॅथेड्रल चर्चच्या आगीनंतरच्या उभारणीसाठी बर्नार्ड आणि त्यांच्या कुटुंबाने 65 कोटी डॉलरची मदत केली होती. 

तर बिल गेट्स यांनी आजवर 35 अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम दान केली आहे. तर अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांनी आपल्या पत्नीला घटस्फोटाच्या तडजोडीसाठी 36.5 अब्ज डॉलरचे शेअर दिल्यानंतरही ते श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानी कायम आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bernard Arnault overtakes Bill Gates to become world’s second-richest person