ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

senior citizen investment best options

या वर्षात बँकेच्या मुदत ठेवी (FD) दरात सुमारे 200 बेसिस पॉइंट्सची घट झाल्यामुळे रेपो दराचा सर्वात मोठा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे

ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय

 पुणे: या वर्षात बँकेच्या मुदत ठेवी (FD) दरात सुमारे 200 बेसिस पॉइंट्सची घट झाल्यामुळे रेपो दराचा सर्वात मोठा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे. सध्या देशातील प्रसिध्द बॅंक SBI तिच्या FD वर 10 वर्षांच्या कालावधीसाठी 2.9 ते 5.4 टक्के व्याज देते. अलीकडेच एचडीएफसी बँकेनेही आपल्या मुदत ठेवींवरील व्याजदर कमी केले. ज्येष्ठ नागरिक प्रामुख्याने व्याजाच्या उत्पन्नावर अवलंबून असतात. वर्षभरात त्यांचे उत्पन्न 35 टक्क्यांपर्यंत घसरले आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खर्चाचे व्यवस्थापन करणे कठीण झाले आहे.

या काळात ज्येष्ठ नागरिक इतर ठिकाणीही त्यांच्या बचतीची गुतंवणूक करू शकतात. 
1. ज्येष्ठ नागरिक बचत योजना- 
या योजनेत 15 लाखांची गुंतवणूक ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत करता येते. या योजनेचे व्याजदर ठराविक काळानंतर वेळेवर अकाउंटवर जमा होत असते. पाच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर 
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा (Senior Citizens’ Savings Scheme- SCSS) कालावधी तीन वर्षांनी वाढवता येते. दुसऱ्या इतर बचत योजनांनी त्यांचं व्याजदर कमी केलं असलं तरी या योजनेचे व्याजदर 7.4% आहे. हे व्याजदर इतर ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या योजनांपेक्षा जास्त आहे.

2. प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY)-
योजना 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना आहे. PMVVY (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana ) योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 10 वर्षांपर्यंत 7.4 %  परताव्याची हमी मिळेल. ही योजना गुड्स आणि सेवा करापासून (GST) मुक्त असणार आहे. 

3. RBI savings bonds-
हे फ्लोटींग-रेट बाँड RBI मार्फत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात 7.15 टक्के दराने जारी होतात. या बाँडवरील व्याजदर दर सहा महिन्यांनी पुन्हा सेट केले जाते. अनिवासी भारतीयांना (NRI) या बाँडमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी नाही. RBI savings bonds मध्ये गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. या योजनेत किमान गुंतवणूक 1000 रुपये आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या विशिष्ट श्रेणीसाठी गरजेचेवेळेस पैसे मिळण्याची परवानगी दिली जाईल. ही बातमी टाईम्स नाउच्या हवाल्याने केली आहे.

4. Post Office Monthly Income Scheme (POMIS)-
POMIS योजनेत  6.60% व्याजदर मिळते. या योजनेत किमान एक हजार रुपयांची, कमाल 4.5 लाख रुपये एका अकाउंटवरून आणि जॉइंट अकाउंट असेल 9 लाखांची मर्यादा आहे.