esakal | "बायबॅक'चा फुगा 
sakal

बोलून बातमी शोधा

"बायबॅक'चा फुगा 

"बायबॅक'मुळे बाजारातील एकूण शेअरची संख्या कमी होते.कंपनीकडे असणारे कर्ज किती व्याजदराने घेतले आहे आहे आणि कंपनी "बायबॅक'मधून किती "अर्निंग: स्वतः कडे वळते करते हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक असते.

"बायबॅक'चा फुगा 

sakal_logo
By
भूषण गोडबोले

कोरोनामुळे उद्भवलेला लॉकडाउन आणि आर्थिक मंदीची परिस्थिती असताना देखील अमेरिकी शेअर बाजाराने पडझड दर्शविल्यानंतर महिन्याभरात वेगाने वर गेला. नॅसडॅक या अमेरिकी शेअर बाजार निर्देशांकाने तर जणू काही काही झालेच नाही या थाटात नवीन उच्चांक नोंदवला. गेल्या आठवड्यात लॉकडाउन उघडल्यानंतर कोरोना संसर्ग पुन्हा वाढल्याने गुरुवारी अमेरिकी शेअर बाजारात एकाच दिवसात 6 टक्के दर्शविली.  सप्ताहअखेर शुक्रवारी डाऊ जोन्सने 477 अंशांची तेजी दर्शवत 25,605 अंशाला बंद झाला. अमेरिकी शेअर बाजाराच्या मोठ्या प्रमाणातील हालचालीमुळे भारतीय शेअर बाजाराने देखील गेल्या आठवड्यात वरखाली करत मोठ्या प्रमाणात हालचाल दर्शविली आहे. 2008 च्या आर्थिक मंदीनंतर वाढत्या अमेरिकी शेअर बाजारातील खरेदीमधील सर्वात मोठा हिस्सा हा नॉन फायनान्शिअल कॉर्पोरेशन्सचा आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

थोडक्यात, गेल्या 10 वर्षात "बायबॅक'चा वापर करत अनेक कंपन्यांनी स्वतःचेच शेअर मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत. स्वतः कंपन्यांनीच "बायबॅक' केल्यामुळे त्या कंपन्यांचे बाजारात उपलब्ध असलेले शेअरची संख्या कमी होते. "बायबॅक'चा अभ्यास करता असे लक्षात येते की, 2010 नंतर प्रतिवर्षी अमेरिकी शेअर बाजारातील एकूण उलाढालीसाठी उपलब्ध असलेल्या शेअरची संख्या  कंपन्यांनी "बायबॅक' केल्याने लक्षणिकरित्या कमी होत  गेली आहे. यामुळे कंपनीच्या वास्तविक नफ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली नसली तरी "अकाउंटिंग'नुसार प्रतिवर्षी झालेल्या नफा  उपलब्ध असलेल्या कमी शेअरमध्ये विभागून प्रतिशेअर होणारा नफा मोजल्यास  "ईपीएस' काढल्यास यात वाढ झाल्याचे दिसत आहे. जेव्हा कंपनीकडे अतिरिक्त "कॅश' उपलब्ध असते तेव्हा कंपनी लाभांश देते किंवा "बायबॅक' करते. कंपनीच्या आगमी काळातील होणाऱ्या उत्पन्नापेक्षा किंवा कंपनीच्या  "ऍसेट व्हॅल्यू'पेक्षा शेअर मंदीमुळे स्वस्त झाला असेल तसेच कंपनीकडे असणाऱ्या पैशामध्ये कोणतीही नवीन संधी घेण्याऐवजी किंवा व्यवसायात असलेल्या पैशाने  वाढ करण्याऐवजी कंपनी स्वतः चेच शेअर 'बायबॅक' करू शकते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

 "बायबॅक'मुळे  बाजारातील एकूण शेअरची  संख्या कमी होते. परिणामी "ईपीएस'मध्ये वाढ होते. यामुळे शेअरची किंमत वाढताना दिसते. कंपनीकडे असणारे कर्ज किती व्याजदराने घेतले आहे आहे आणि कंपनी "बायबॅक'मधून किती "अर्निंग: स्वतः कडे वळते करते हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक असते. अमेरिकेत सध्या व्याजाचे दर खूपच कमी आहेत ज्यावेळेस व्याजाचे दर वाढायला लागतात आणि कर्ज महाग होतात त्यावेळेस मिळकत कमी आणि कर्ज जास्त होत असेल तर "बायबॅक' परवडणारे नसते आणि यामुळे "बायबॅक'चे प्रमाण  कमी होत जाते. अमेरिकी शेअर बाजार महाग "व्हॅल्यूएशन'ला "बायबॅक' तसेच कर्जाच्या बईलावर बसून उधळत आहे .भारतात ज्याप्रमाणे लाभांशावर कर आहे,त्याचप्रमाणे "बायबॅक'वर देखील कर लावला आहे तर अमेरिकेत यावरील बंधनांवर उलट सुलट चर्चा सुरु आहेत. अमेरिकी शेअर बाजाराच्या  हालचालींचा जगभरातील शेअर बाजारांवर परिणाम होतो. ज्याचा प्रत्यय 2008 मध्ये आला. यामुळे गुंतवणूकदारांनी "बायबॅक'चा फुगा लक्षात घेऊन  कोणतीही कंपनी केवळ स्वतः चे शेअर "बायबॅक' करत आहे. म्हणून हुरळून जाऊन त्या कंपनीच्या शेअर खरेदीचा विचार करण्याऐवजी "बायबॅक'च्या बरोबरीने कंपनीच्या वास्तविक "प्रॉफिट आफ्टर टॅक्स'मध्ये वाढ होत आहे का? तसेच कंपनीचे एकूण कर्ज कमी आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे कंपनीचे "बिझनेस मॉडेल' उत्तम "रिटर्न ऑन कॅपिटल' मिळवत आहे का? याचा विचार करूनच दीर्घकाळासाठी शेअरची निवड करून टप्याटप्याने खरेदी करणे हितावह ठरेल.

हेही वाचा : सरप्राईज: बाजारात 'V' शेप  रिकव्हरी

लेखक सेबी रजिस्टर्ड गुतंवतणूक सल्लागार आहेत.

loading image