esakal | होय, म्युच्युअल फंड सही है !!!
sakal

बोलून बातमी शोधा

होय, म्युच्युअल फंड सही है !!!

दैनंदिन जीवनाच्या व्यापात शेअर बाजारात अभ्यासपूर्ण गुंतवणूक करणे सामान्य गुतंवणूकदारांना शक्य होत नसल्याने सामान्य गुतंवणूकदार म्युच्युअल फंडामार्फत शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. 

होय, म्युच्युअल फंड सही है !!!

sakal_logo
By
भूषण गोडबोले

यशस्वी गुंतवणूक गुरु वॉरेन बफे यांनी शेअर बाजारात अभ्यास पूर्ण गुंतवणूक करून मोठा परतावा (रिटर्न) मिळविले. ते म्हणतात त्यांच्या पश्चात त्यांचे पैसे अमेरिकेत 'इंडेक्स फंडा'त गुंतविण्याचा सल्ला देतात. दैनंदिन जीवनाच्या व्यापात शेअर बाजारात अभ्यासपूर्ण गुंतवणूक करणे सामान्य गुतंवणूकदारांना शक्य होत नसल्याने सामान्य गुतंवणूकदार म्युच्युअल फंडामार्फत शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. बाजारात सतत चढ- उतार होत असल्याने गुंतवणूक केल्यावर बाजाराने मोठ्या प्रमाणात घसरण दर्शविल्यास मोठे नूकसान होऊ शकते. म्हणून एकदम सगळी गुंतवणूक करण्यापेक्षा  दिर्घकाळासाठी दरमहा थोडी थोडी टप्प्याटप्याने (सिस्टिमॅटिक इनव्हेसमेंट प्लॅन) शेअर बाजारात  गुंतवणूक करण्याचा ट्रेंड अत्यंत लोकप्रिय आहे. विविध कालावधीमध्ये विविध 'अॅसेट क्लास'ने चांगल्या प्रमाणात 'रिटर्न' दिल्याचे लक्षात येते. कधी सोने तर कधी शेअर बाजार .

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जागतिक बाजाराचा विचार करता अमेरिकी शेअर बाजाराने 1937 साली जो उच्चांक गाठला होता तो त्या ठिकाणी पुन्हा येण्यासाठी  साधारण  12 ते 13 वर्ष घेतली होती तर जपानच्या शेअर बाजाराने 1990 पर्यंत मोठ्या प्रमाणात वाढ दर्शविल्यानंतर काही वर्षे  घसरण दर्शविली. मागील  30 वर्ष 1990 मधील उच्चांकाला अद्यापही गवसणी घातली नाही. अशाप्रकारे शेअर बाजारात अनिश्चितता असल्याने सामान्य गुंतवणूकदाराने गुंतवणूक करताना जोखीम ओळखून विविध 'अॅसेट क्लास'मध्ये  टप्याटप्याने गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते. भारतीय अर्थव्यवस्था 'डेव्हलपिंग स्टेज'मध्ये आहे. यामुळे दिर्घकाळात भारतीय शेअर बाजारातील अनेक कंपन्यांची उत्तम कामगिरी अपेक्षित आहे. यामुळे या दीर्घकाळात होणाऱ्या वाढीचा भागीदार होण्यासाठी भारतातील आघाडीच्या 50 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा निफ्टी किंवा आघाडीच्या 30 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारा सेन्सेक्स तसेच जोखीम लक्षात घेऊन 'निफ्टी नेक्स्ट फिफ्टी' या इंडेक्स फंडाची दरमहा गुंतवणुकीसाठी निवड करणे फायदेशीर ठरू शकेल. मागील 10 वर्षामधे निफ्टीपेक्षा सोन्याने जास्त परतावा दिला आहे. पण, प्रत्येक वेळी असाच परतावा मिळेल असे नाही. मात्र एकूण जोखीम कमी करण्यासाठी शेअर बाजाराबरोबर सोन्यामध्ये देखील म्युच्युअल फंडामार्फत टप्याटप्याने गुंतवणूक करणे हितावह ठरू शकेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अॅमेझॉन ,गुगल ,ऍपल , मायक्रोसॉफ्ट इत्यादी अनेक कंपन्याची सर्व्हिस किंवा उत्पादन आज आपल्या आयुष्याचे अविभाज्य अंग बनले आहे. अमेरिकेतील अशा बलाढ्य कंपन्यांच्या शेअरमध्ये भारतातून म्युच्युअल फंडामार्फत गुंतवणूक करणे शक्य आहे.  मागील 40 ते 45 वर्षात डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत गेला आहे. अमेरिकेतील शेअर बाजारात भारतातून गुंतवणूक केल्यास तेथील कंपन्यांच्या शेअरने वाढ दर्शविली आणि त्या काळात डॉलर ने देखील तेजी दर्शविली तर तेथील बाजारात केलेल्या गुंतवणुकीवर दुहेरी फायदा मिळतो. मात्र बाहेरील बाजारात गुंतवणूक करताना शेअर बाजारा पाठोपाठ 'करन्सी रिस्क' वाढते. ही जोखीम ओळखून अशा आंतरराष्ट्रीय दिग्गज कंपन्यांमधे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडात देखील टप्याटप्याने दीर्घावधीसाठी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. शेअर बाजार असो किंवा सोन्यामधील गुंतवणूक चढ उताराची जोखीम तर इथे आहेच. यामुळे आवश्यक पैसा सुरक्षित 'अॅसेट क्लास'मध्ये गुंतवणूक करून ज्या रकमेवर जोखीम घेणे शक्य आहे अशीच रक्कम शेअर बाजारात किंवा सोन्यामध्ये गुंतवणे योग्य आहे.  मात्र जोखीम स्वीकारताना टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करून सोने,शेअर बाजार,आंतरराष्ट्रीय बाजार अशा विविध पर्यायांची निवड करता येऊ शकते. कारण म्हटलेच आहे Don't Put All your Eggs in One Basket. 

सेबी रजिस्टर्ड गुतंवतणूक सल्लागार