'हम तो झुंड में चलते है'

भूषण गोडबोले
Monday, 21 September 2020

आयटी क्षेत्रातील विप्रो लि. या कंपनीच्या शेअरचा भाव रु. २६७ च्या वर आहे, तसेच एम्फसिस लि. या कंपनीच्या शेअरचा भाव रु. १०८० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत तेजीचा कल दिसत आहे.

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्‍स’ ३८,८४५ अंशावर, तर ‘निफ्टी’ ११,५०४ अंशावर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील तसेच औषध (फार्मा) क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरनी उत्तम तेजी दाखविली. या महिन्यात नऊ सप्टेंबरपासून तेजी दाखविल्यानंतर आता बाजार किरकोळ मंदी म्हणजेच ‘करेक्‍शन’ दर्शवीत आहे. पुढील आठवड्यासाठी ‘निफ्टी’ची ११,१८४ अंश ही महत्त्वाची पातळी आहे. शॉर्टटर्म चार्टनुसार ‘निफ्टी’ जोपर्यंत ११,१८४ अंशांच्या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत तेजीचा कल आहे. मात्र, मागील अनेक लेखांमध्ये नमूद केल्यानुसार बाजाराचे मूलभूत म्हणजेच ‘फंडामेंटल’नुसार मूल्यांकन अर्थात व्हॅल्युएशन महाग असल्याने ‘ट्रेडिंग’ करताना मर्यादित भांडवलावर मर्यादित जोखीम स्वीकारणेच योग्य ठरेल. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘ट्रेडिंग’साठी कोणते शेअर निवडावेत?
प्रसिद्ध ट्रेडर जेसी लिव्हरमोर म्हणतात, ‘वॉच द लीडर’. शेअर बाजारामध्ये औषध, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम, बॅंकिंग, धातू, ऊर्जा आदी विविध क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये खरेदी-विक्री होत असते. यातील कोणत्या क्षेत्रातील कंपन्या तेजीचा कल दर्शवीत आहेत; म्हणजेच तेजीचे नेतृत्व करीत आहेत, हे आलेखांवरून पडताळणे आवश्‍यक असते. तेजी असताना, केवळ एखाद् दुसरा शेअर तेजी दाखविण्याऐवजी बहुतांश वेळा विशिष्ट क्षेत्रातील शेअर ‘हम तो झुंड में चलते है’ म्हणत एकत्र तेजी दर्शवीत असतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अपोलो हॉस्पिटलच्या शेअरकडे लक्ष
हॉस्पिटल आणि मेडिकल सर्व्हिसेसमधील अपोलो हॉस्पिटल या फार्मा क्षेत्राशी निगडित असलेल्या कंपनीच्या शेअरने ऑगस्ट महिन्यापासून मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविला आहे. रु. १८१३ या रेसिस्टन्स म्हणजेच अडथळा पातळीच्या वर रु. १८२८ ला बंद भाव देऊन शॉर्टटर्म तसेच मीडियम टर्मसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. अपोलो हॉस्पिटलच्या शेअरचा भाव रु. १५८४ या ‘स्टॉपलॉस’ पातळीच्या वर आहे, तोपर्यंत आगामी कालावधीमध्ये या शेअरमध्ये आणखी वाढ होऊ शकते. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आयटी व फार्मा क्षेत्रात तेजीची शक्‍यता
आयटी क्षेत्रातील विप्रो लि. या कंपनीच्या शेअरचा भाव रु. २६७ च्या वर आहे, तसेच एम्फसिस लि. या कंपनीच्या शेअरचा भाव रु. १०८० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत तेजीचा कल दिसत आहे. आगामी कालावधीमध्ये निर्देशांकाने तसेच तेजीचा कल दर्शविणाऱ्या शेअरनी तेजीचे संकेत दिल्यास अशा शेअरमध्ये ‘स्टॉपलॉस’ ठेवून खरेदीचे व्यवहार करणे फायदेशीर ठरू शकेल. लाँग टर्मचा विचार करता, फार्मा क्षेत्रातील डॉ. लाल पॅथ लॅब, थायरोकेअर लि. या कंपन्यांच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने मर्यादित गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल. 

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना शेअर बाजारातील जोखीम ओळखणे आणि गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे, हे नेहमीप्रमाणेच आवश्‍यक आहे.

(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhushan godbole writes article about sensex & nifty