डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशन आणि गुंतवणूक संधी

तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसायात प्रगती करण्यासाठी ग्राहकांच्या बदलत्या गरजा, मागणी, ग्राहकांना व्यवहार करताना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन व्यवसायवृद्धीसाठी तंत्रज्ञान विकसित करणे योग्य ठरते.
Bhushan Godbole writes Digital transformation and investment opportunities
Bhushan Godbole writes Digital transformation and investment opportunitiessakal
Summary

तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसायात प्रगती करण्यासाठी ग्राहकांच्या बदलत्या गरजा, मागणी, ग्राहकांना व्यवहार करताना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन व्यवसायवृद्धीसाठी तंत्रज्ञान विकसित करणे योग्य ठरते.

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५३,७६० अंशांवर, तर ‘निफ्टी’ १६,०४९ अंशांवर बंद झाले. गेल्या काही दिवसांत तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या शेअर पाठोपाठ या क्षेत्रातील एल अँड टी इन्फोटेक, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये देखील पडझड झाली. ‘बिझनेस डिजिटलायझेशन’ हे तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण आहे, जे ग्राहक आणि इतर भागधारकांसह त्यांच्या विविध क्षेत्रांमध्ये, सेवा आणि चॅनेलवर संस्थांच्या कार्यपद्धतीत बदल घडवून आणते. सध्याच्या काळात ‘फॉर्च्युन ५००’; तसेच अनेक कंपन्यांच्या गरजा लक्षात घेतल्यास असे लक्षात येते, की अनेक मोठ्या कंपन्यांना त्यांच्या व्यवसायाचे डिजिटलायझेशन करायचे आहे. यामुळे आगामी काळात भारतीय आयटी सेवा कंपन्यांना मोठ्या प्रमाणात काम मिळणार आहे. मात्र, मागणीनुसार पुरेसे कर्मचारी मिळवणे हेच भारतीय आयटी सेवा कंपन्यांसाठी मुख्य आव्हान असू शकते. आयटी क्षेत्राचा विचार करता, भविष्यातील व्यवसायविस्ताराची संधी लक्षात घेऊन टीसीएस, तसेच एल अँड टी इन्फोटेक या कंपन्यांच्या शेअरचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसायात प्रगती करण्यासाठी ग्राहकांच्या बदलत्या गरजा, मागणी, ग्राहकांना व्यवहार करताना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन व्यवसायवृद्धीसाठी तंत्रज्ञान विकसित करणे योग्य ठरते. ग्राहकांच्या खरेदीच्या संदर्भातील वर्तणुकीचे विश्लेषण करून विविध स्तरावर पुरवठा साखळीत; तसेच व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर करून पेंट्स क्षेत्रातील एशियन पेंट्स, पॅराशूट हेअर ऑइलची निर्माती मॅरिको, जॉकी या नामवंत ब्रँडच्या कपड्यांची निर्मिती करणारी पेज इंडस्ट्रीज, कर्ज वितरणातील बजाज फायनान्स, डॉमिनोज पिझ्झा तसेच डंकन डोनट्स या नामवंत फास्ट फूड चेन्स चालवणारी ज्युबिलंट फूड वर्क्स, डायग्नोस्टिक सेवांमधील डॉ. लाल पॅथ लॅब आदी अनेक कंपन्यांनी कर्जाचे प्रमाण कमी ठेऊन व्यवसायात गुंतविलेल्या भांडलावर उत्तम परतावा मिळवत प्रगती केली आहे.

बजाज फायनान्स लि. (शुक्रवारचा बंद भाव रु. ५९१५)

बजाज फायनान्स ही कंपनी मुख्यतः कर्ज देण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. या कंपनीची सर्वांत मोठी ताकद म्हणजे त्याच्या मालकीच्या ग्राहक डेटानुसार उच्च क्रेडिट गुणवत्ता असलेल्या कर्जदारांना निवडकपणे लक्ष्य करून व्यवसायवृद्धीसाठी हुशारीने केलेला वापर. आकडेवारीनुसार या कंपनीच्या सुमारे ४९ दशलक्ष ग्राहकांपैकी साधारण २५ दशलक्ष ग्राहक, हे त्यांचे सर्वोत्तम ग्राहक आहेत, ज्यांच्यासोबत कंपनी व्यवसायवृद्धी करण्यास इच्छुक आहे. नव्या डिजिटल व्यवसाय परिवर्तन अंतर्गत कंपनी आगामी काळात सुमारे १०० दशलक्षपेक्षा जास्त ग्राहकवर्गासोबत व्यवसाय करू इच्छित आहे. ही कंपनी आपल्या कन्झ्युमर ड्युरेबल कर्जपुरवठा व्यवसायाद्वारे ग्राहक मिळवते. या कंपनीच्या ‘अॅप’चे आधीच १० दशलक्षपेक्षा जास्त ‘डाउनलोड’ झाले आहेत; त्यापैकी सुमारे ५ दशलक्षपेक्षा अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. दरवर्षी सुमारे १५ टक्यांपेक्षा जास्त इक्विटीवर परतावा देत ही कंपनी कर्ज वितरणात गेल्या १० वर्षांमध्ये सर्वांत वेगाने वाढणारी कंपनी आहे. कंपनीच्या व्यवसायवृद्धीची क्षमता आणि नव्या युगाच्या फिन-टेकमध्ये रुपांतरित होण्यासाठी कंपनी करत असलेली वाटचाल लक्षात घेता, हा शेअर किमतीच्या दृष्टीने महाग वाटत असला तरी दीर्घावधीसाठी या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास उत्तम फायदा मिळू शकेल.

‘डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशनला पर्याय नाही. दूरदर्शी कंपन्या स्वतःसाठी नवे धोरणात्मक पर्याय तयार करतील. जे जुळवून घेणार नाहीत, ते अयशस्वी होतील.’

- जेफ बेझोस, ॲमेझॉन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com