आता हंगाम विलीनीकरणाचा!

गृहवित्त क्षेत्रातील दिग्गज कंपनी एचडीएफसी लि. आणि खासगी क्षेत्रातील अग्रेसर बँक एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाबाबत घोषणा करण्यात आली.
Bhushan Godbole writes mergers of company share market hdfc bank
Bhushan Godbole writes mergers of company share market hdfc banksakal
Summary

जागतिक पातळीवर खनिज तेलाचे दर ११० डॉलर प्रतिपिंप पुढे गेले आहेत, तर डॉलरच्या तुलनेत रुपया ७६.९०च्या आहे. अशा वेळेस बाजारात पडझड आणि चिंतेचे वातावरण असताना, कोणत्या कंपन्यांच्या शेअरमध्ये दीर्घावधीच्या दृष्टीने विचार करणे योग्य ठरू शकेल, हे पाहावे लागेल.

जागतिक पातळीवर नकारात्मक संकेत मिळाल्याने गेल्या आठवड्यात शुक्रवारी ‘सेन्सेक्स’ ८६६ अंशांची घसरण दर्शवून ५४,८३५ अंशांवर, तर ‘निफ्टी’ २७१ अंशांच्या पडझडीसह १६,४११ अंशांवर बंद झाले होते. महागाईला लगाम घालण्यासाठी अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याजदरवाढीचे पाऊल उचल्याने गेल्या आठवड्यात अमेरिकी शेअर बाजाराने घसरण दर्शविली. या घसरणीचे पडसाद आशियाई बाजारात उमटले. गेल्या आठवड्यात जागतिक पातळीवरील व्याजदरवाढीच्या प्रवाहात सामील होत रिझर्व्ह बँकेने नियोजित वेळेआधीच तातडीच्या बैठकीद्वारे रेपो दरात वाढ केली. सध्या जागतिक पातळीवर खनिज तेलाचे दर ११० डॉलर प्रतिपिंप पुढे गेले आहेत, तर डॉलरच्या तुलनेत रुपया ७६.९०च्या आहे. अशा वेळेस बाजारात पडझड आणि चिंतेचे वातावरण असताना, कोणत्या कंपन्यांच्या शेअरमध्ये दीर्घावधीच्या दृष्टीने विचार करणे योग्य ठरू शकेल, हे पाहावे लागेल.

गेल्या महिन्यात गृहवित्त क्षेत्रातील दिग्गज कंपनी एचडीएफसी लि. आणि खासगी क्षेत्रातील अग्रेसर बँक एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाबाबत घोषणा करण्यात आली. मार्चमध्ये चित्रपटगृहांची साखळी चालविणाऱ्या पीव्हीआर लि. आणि आयनॉक्स लीझर लि. या दोन मोठ्या कंपन्यांनी विलीनीकरणाबाबत घोषणा केली. याआधी मनोरंजन क्षेत्रातील सोनी पिक्चर्स आणि झी एंटरटेन्मेंट या कंपन्यांनी देखील विलीनीकरणाबाबत घोषणा केली आहे. आता लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (एलटीआय) आणि माइंड ट्री या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या विलीनीकरणाची घोषणा झाली आहे. सध्या जणू कंपन्यांच्या विलीनीकरणाचा हंगामच सुरु असल्याचे चित्र समोर येत आहे. प्रत्येक विलीनीकरण फायदेशीर ठरतेच, असे नाही. कधी विलीनीकरणानंतर ‘एक और एक ग्यारह’ होऊ शकतात, तर कधी विलीनीकरणांनंतर व्यवसायवृद्धीची बेरीज होण्याऐवजी वजाबाकीच होऊन बसते. विलीनीकरणानंतर व्यवसायवृद्धीचा विचार करता, व्यवसायवाढीचा फायदा कोणत्या कंपन्यांना मिळू शकेल, याचा विचार करूया.

लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक

लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक आणि माईंड ट्री या दोन्ही कंपन्या एल अँड टी समूहाचा भाग आहेत. २०१९ मध्ये एल अँड टी समूहाने माईंड ट्री या कंपनीचे अधिग्रहण केले होते. कंपनीने केलेल्या घोषणेनुसार विलीनीकरणानंतर गुंतवणूकदारांना माईंड ट्रीच्या १०० शेअरच्या बदल्यात लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकचे ७३ शेअर देण्यात येणार आहेत. एकत्रिकरणानंतर निर्माण होणाऱ्या ‘एलटीआय माइंड ट्री’मध्ये एल अँड टी या पालक कंपनीची ६८.७३ टक्के हिस्सेदारी असेल. एल अँड टी या कंपनीचे अध्यक्ष ए. एम. नाईक यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक आणि माईंड ट्री या दोन कंपन्यांचे व्यवसाय एकमेकांना पूरक असल्याने त्याच्या एकत्रीकरणाचा या दोन्ही कंपन्यांना; तसेच त्यांच्या ग्राहकवर्गाला, भागधारकांना, गुंतवणूकदारांना, कर्मचाऱ्यांना फायदा होऊ शकेल.

सध्याच्या काळात अनेक मोठ्या कंपन्यांना त्यांच्या व्यवसायाचे ‘डिजिटलायझेशन’ करायचे आहे. यामुळे भारतीय आयटी सेवा कंपन्यांना मोठ्या प्रमाणात काम मिळत आहे. ‘एल अँड टी’ने लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक आणि माइंड ट्री या दोन्ही कंपन्यांच्या कर्जाचे प्रमाण कमी ठेवून व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर सातत्याने १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत उत्तमरित्या व्यवसायवृद्धी केली आहे. विलीनीकरणानंतर एकत्रित होणाऱ्या व्यवसायवृद्धीचा दोन्ही कंपन्यांना फायदा मिळू शकेल. आयटी क्षेत्राचा विचार करता, भारतातील कंपन्यांची क्षमता, तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त दरातील मनुष्यबळ; तसेच भविष्यातील व्यवसायविस्ताराची संधी लक्षात घेता, लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (शुक्रवारचा बंद भाव रु. ४५९३) या शेअरचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

एचडीएफसी बँक

दीर्घावधीमध्ये बँकिंग क्षेत्रातील संभाव्य प्रगती, ध्रुवीकरण; तसेच एचडीएफसी लि. व एचडीएफसी बँक यांचे संभाव्य विलीनीकरण आणि व्यवसायवृद्धीचा विचार करता, एचडीएफसी बँक (शुक्रवारचा बंद भाव रु. १३१७) या शेअरमध्ये देखील टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल.

या लेखातील माहिती शैक्षणिक दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com