बिग बझारचा ‘महाबचत सेल’

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

पुणे - बिग बझारने स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या ग्राहकांसाठी पाच दिवसांची ‘महाबचत सेल’ ही योजना आणली असून, त्याअंतर्गत खरेदीवर भरघोस सूट देण्यात येणार आहे. शनिवार ११ ऑगस्ट ते १५ ऑगस्टदरम्यान ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार असून, या योजनेअंतर्गत पे वॉलेट, पेटीएमद्वारे ३ हजार रुपयांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १२०० रुपयांपर्यंत कॅशबॅंक मिळणार आहे. तसेच, एसबीआयच्या डेबिटकार्डद्वारे खरेदीवर १० टक्के डिस्काउंटही देण्यात येणार असल्याची माहिती बिग बझारचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदाशिव नायक यांनी दिली.

पुणे - बिग बझारने स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या ग्राहकांसाठी पाच दिवसांची ‘महाबचत सेल’ ही योजना आणली असून, त्याअंतर्गत खरेदीवर भरघोस सूट देण्यात येणार आहे. शनिवार ११ ऑगस्ट ते १५ ऑगस्टदरम्यान ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार असून, या योजनेअंतर्गत पे वॉलेट, पेटीएमद्वारे ३ हजार रुपयांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १२०० रुपयांपर्यंत कॅशबॅंक मिळणार आहे. तसेच, एसबीआयच्या डेबिटकार्डद्वारे खरेदीवर १० टक्के डिस्काउंटही देण्यात येणार असल्याची माहिती बिग बझारचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदाशिव नायक यांनी दिली. महाबचत योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना बिलिंगसाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागू नये म्हणून घरपोच सेवा, मोठ्या उत्पादनांसाठी चेक इन-आऊट तसेच एम-पॉससारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही नायक यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big Bazaar Mahabachat sale to begin tomorrow

टॅग्स