
Share Market : गुंतवणूकदार झाले मालामाल! 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
रेमंड या सुप्रसिद्ध कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअरने मोठा परतावा दिला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी या शेअरने विक्रीचा उच्चांक गाठला आहे.
रेमंड लिमिटेडचे शेअर्स शुक्रवारी 20 टक्क्यांपर्यंत वाढले 610.30 रुपयांवर बंद झाले. ट्रेडिंग दरम्यान शेअरची किंमत 260 रुपयांपेक्षा जास्त वाढली आणि 1,629.95 रुपयांवर गेली. शेअरची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी आहे. तर 20 डिसेंबर 2021 रोजी शेअर 585.55 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होता. BSE वर Raymond Ltd चे मार्केट कॅप रु. 10,700 कोटी पर्यंत वाढले आहे.
हेही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून
रेमंडच्या शेअर्सनी एका वर्षात 155.53 टक्के वाढ नोंदवली आहे आणि 2022 मध्ये त्याची किंमत 153.05 टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीने दुसऱ्या तिमाहीतील नफा जाहीर केल्यानंतर शेअर्स 34% वाढले आहेत.
सप्टेंबरच्या तिमाहीत रेमंडचा निव्वळ नफा 161.95 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षातील जुलै-सप्टेंबर या तिमाहीत कंपनीने 56.15 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीतील 1,551.32 कोटी रुपयांच्या तुलनेत कामकाजातील महसूल 39.76 टक्क्यांनी वाढून 2,168.24 कोटी रुपये झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत एकूण खर्च 31.27 टक्क्यांनी वाढून 1,954.18 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.