Share Market: RBIच्या निर्णयानंतर शेअर बाजार कोसळसा; सेन्सेक्स 1,306 तर निफ्टी 391 अंकांनी घसरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market Latest News Updates

Share Market: RBIच्या निर्णयानंतर शेअर बाजार कोसळसा; सेन्सेक्स 1,306 तर निफ्टी 391 अंकांनी घसरला

Share Market Live Updates: आरबीआयचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली आहे. यामुळे बँकांसह सर्वसामान्यांना कर्ज घेणे महाग होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर आज शेवटच्या सत्रात शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक कोसळले. आज दिवसअखेर सेन्सेक्स 1,306.96 अंकांची म्हणजे 2.29 टक्क्यांच्या घसरणीसह 55.669.03 वर बंद झाला, तर निफ्टी तब्बल 391.50 अंकांच्या म्हणजेच 2.29 टक्क्यांच्या घसरणीसह 16677.60वर बंद झाला. दिवसअखेर केवळ 5 शेअर्स हिरव्या चिन्हात बंद झाले तर 45 शेअरमध्ये घट झाली. सकारात्मक कामगिरी करणाऱ्या शेअर्समध्ये ONGC, BRITANNIA, POWERGRID, NTPC, KOTAKBANK यांचा समावेश असून APOLLOHOSP, ADANIPORTS, HINDALCO, TITAN, BAJAJFINCE सह 45 शेअर्स मोठ्या घसरणीसह बंद झाले.

तत्पूर्वी रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचे पडसाद शेअर बाजारावर उमटले. या निर्णयानंतर दुपारच्या सत्रात शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 55,501.60 पर्यंत कोसळला तर निफ्टीमध्येही 16,623.95 पर्यंत घसरण झाली.

आरबीआयचे (Reserve Bank of India) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली आहे. यामुळे बँकांसह सर्वसामान्यांना कर्ज घेणे महाग होणार आहे. महागाईमुळे आधीच कंबरडे मोडलेल्या सामान्यांना आणखी एक जोरदार फटका बसला असून, रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णयामुळे बँकेच्या कर्जांचे हप्ते महागणार आहेत.

याचा फटका सामान्यांना बसणार असून, यामुळे सर्वसामान्यांच्या कर्जांचे हप्ते वाढणार असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी जागतिक आर्थिक घडामोडींची गती मंदावली असल्याचे म्हटले आहे आणि त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरदेखील दिसून येत आहे.