esakal | झोमॅटोच्या IPO ला गुंतवणुकदारांचा मोठा प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

Zomato IPO

झोमॅटोच्या IPO ला गुंतवणुकदारांचा मोठा प्रतिसाद

sakal_logo
By
Team eSakal

मुंबई - घरपोच खाद्यपदार्थ पोहचवणाऱ्या झोमॅटोच्या प्राथमिक भागविक्रीस (IPO) गुंतवणुकदारांकडून अत्यंत चांगल्या प्रतिसाद मिळाला. आज पहिल्याच दिवशी विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या समभागांपेक्षाही जास्त मागणी (Over Subscribed) नोंदविण्यात आली. (Big response from investors to Zomato IPO)

हेही वाचा: राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार? शरद पवारांनी केला मोठा खुलासा

झोमॅटोच्या 71 कोटींपेक्षा जास्त समभागांसाठी आज पहिल्या दिवसअखेर 75 कोटीपेक्षा जास्त मागण्या आल्या. सामान्य गुंतवणुकदारांनी 2.69 टक्के तर संस्थात्मक गुंतवणुकदारांनी त्यांच्यासाठी राखीव असलेल्या समभागांपैकी 98 टक्के समभागांसाठी मागणी नोंदवली. अन्य बड्या गुंतवणुकदारांनी फक्त 13 टक्के तर झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांनीही फक्त 18 टक्केच मागणी पहिल्या दिवशी नोंदवली आहे. भागविक्री शुक्रवारी संपेल. ही माहिती मुंबई शेअर बाजाराच्या (BSE) वेबसाईटवर नोंदविण्यात आली आहे.

loading image