esakal | राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार? शरद पवारांनी केला मोठा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार? शरद पवारांनी केला मोठा खुलासा

राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार? शरद पवारांनी केला मोठा खुलासा

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याशी त्यांच्या झालेल्या भेटीगाठी, त्यानंतर सुरु झालेल्या काँग्रेसविरहीत तिसऱ्या आघाडीच्या चर्चा आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी घेतलेली राहुल गांधींची भेट अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांसाठी शरद पवार यांची निवड व्हावी यासाठीच्या मोर्चेबांधणीसाठी ही बैठक असल्याचंही बोललं गेलं. पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर प्रशांत किशोर शरद पवार यांच्याशी दोनवेळा भेटले होते. मात्र, यासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे शरद पवार यांनी दिली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज महत्त्वाच्या गोष्टींबाबत खुलासे केले आहेत. त्यांनी म्हटलंय की, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मी उमेदवार असल्याच्या सगळ्या चर्चा साफ खोट्या आहेत. मला माहितीय की, ज्या पक्षाकडे 300 हून अधिक खासदार आहेत, त्या निवडणुकीचा निकाल काय असणार आहे. मी या निवडणुकीसाठीचा उमेदवार असणार नाही.

हेही वाचा: "राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर कमी, पण निर्बंधांत सूट नाही"

हेही वाचा: सैन्यातील आणखी 147 महिलांना मिळणार लष्करी तुकडीचे नेतृत्व

हेही वाचा: वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेत वाढ

पुढे त्यांनी म्हटलंय की, प्रशांत किशोर मला दोनदा भेटले, पण आम्ही त्यांच्या एका कंपनीबद्दलच बोललो. या भेटीमध्ये राष्ट्रपती पदाची उमेदवारी अथवा 2024 च्या लोकसभा निवडणुकीचं नेतृत्व यासंदर्भात कसल्याही चर्चा आम्ही केली नाही. प्रशांत किशोर यांनी मला सांगितलंय की त्यांनी निवडणूक रणनीतीचं क्षेत्र सोडून दिलं आहे. आतापर्यंत राज्यांच्या निवडणुका अथवा 2024 च्या लोकसभा निवडणुका अशा कोणत्याच निवडणुका संदर्भात काहीही ठरलं नाहीये. निवडणुका खूप लांब आहेत, राजकीय परिस्थिती ही सतत बदलत राहते. मी या येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांचं नेतृत्व मी करणार नाहीये.

loading image