
Bill Gates Girlfriend : 67 वर्षांचे बिल गेट्स प्रेमात? जाणून घ्या कोण आहे त्यांची गर्लफ्रेंड
Bill Gates Girlfriend : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स पुन्हा एकदा प्रेमात पडले आहेत. 67 वर्षीय बिल गेट्स सध्या पॉला हर्डला डेट करत आहेत.
पॉला 60 वर्षांच्या आहेत आणि त्या ओरॅकल कंपनीचे दिवंगत सीईओ मार्क हर्ड यांच्या पत्नी देखील आहेत.
दोघेही जवळपास एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. पीपल डॉट कॉममध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ते दोघेही एकमेकांना डेट करत आहेत आणि पॉला हर्ड अद्याप बिल गेट्सच्या मुलांना भेटलेल्या नाहीत.
विशेष म्हणजे पॉला हर्ड आणि बिल गेट्स गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एकत्र दिसले होते. यापूर्वी मार्च 2022 मध्येही दोघांचा एकमेकांसोबतचा फोटो समोर आला होता. दोघांनीही बरेच दिवस आपले नाते जगाच्या नजरेपासून लपवून ठेवले होते.
बिल गेट्स यांनी 2021 मध्ये मेलिंडा गेट्सला घटस्फोट दिला आणि त्यांचे 27 वर्ष जुने वैवाहिक जीवन संपुष्टात आले. दोघांनी ऑगस्ट 2021 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती. दोघांना तीन मुले आहेत. जेनिफर गेट्स, फोबी गेट्स आणि रोरी गेट्स.
बिल गेट्स यांची गर्लफ्रेंड कोण?
पॉला हर्ड या ओरॅकलचे माजी अध्यक्ष मार्क हर्ड यांच्या पत्नी आहेत. लग्नाच्या 30 वर्षानंतर मार्क हर्डचे 2019 मध्ये निधन झाले.
पॉला हर्डच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्या एनसीआर (National Cash Register) नावाच्या कंपनीत काम करते. त्यांना कॅथरीन आणि केली नावाच्या दोन मुली आहेत.
हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम
बिल गेट्स यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1955 रोजी वॉशिंग्टन, यूएसए येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची आवड होती. 1975 मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्ट नावाची कंपनी स्थापन केली. सन 2000 नंतर ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.
गेट्स यांनी जाहीर केले आहे की ते त्यांच्या मुलांना फक्त 10 अब्ज डॉलर देतील आणि उर्वरित संपत्ती देणगी म्हणून देतील. त्यांची एकूण संपत्ती 105.9 अब्ज डॉलर आहे.